Chandrayaan-3 Landing Update second and final deboosting operation reduced the LM orbit to 25 km into 134 km  
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 Update : चांद्रयानचं आणखी एक पाऊल पुढे! उरले फक्त २५ किमी; मॉड्यूलचे अंतिम डीबूस्टिंगही यशस्वी

रोहित कणसे

चांद्रयान-३ हे चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. विक्रम लँडर रात्री उशिरा म्हणजेच रविवारी (२० ऑगस्ट) पहाटे २ ते ३ च्या दरम्यान चंद्राच्या जवळ पोहोचले. आता विक्रम चंद्रापासून अवघे २५ किलोमीटर दूर आहे. यापूर्वी ते ११३ किमी x १५७ किमीच्या कक्षेत पोहचले होते.

दुसऱ्या डिबूस्टिंग ऑपरेशनने (वेग कमी करण्याची प्रक्रिया) कक्षा २५ किमी x १३४ किमी इतकी कमी केली आहे म्हणजेच आता चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लँडरचे अंतर फक्त २५ किमी बाकी आहे. आता सर्वजण २३ ऑगस्ट रोजी यशस्वी लँडिंगच्या प्रतीक्षेत आहेत. लँडिंग करण्यापूर्वी, मॉड्यूलची तपासणी होईल आणि नियोजीत लँडिंग साइटवर सूर्योदयाची वाट पाहावी लागणार आहे.

पहिले डीबूस्टिंग १८ ऑगस्ट रोजी

चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगसाठी, चांद्रयान-३ च्या लँडरचा वेग कमी करणे सर्वात महत्वाचे आहे. लँडिंग मिशनसाठी हे सर्वात मोठे आव्हान आहे. यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी डीबूस्टिंगची पहिली प्रक्रिया करण्यात आली होती.

रविवारी झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या डीबूस्टिंगबद्दल, इस्रोने सांगितले की ऑपरेशन यशस्वी झाले आणि त्याने कक्षा २५ किमी x १३४ किमी कमी केली आहे. सॉफ्ट लँडिंगसाठी पॉवर्ड डिसेंट २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी५.४५ वाजता सुरू होण्याची अपेक्षा आहे.

दक्षिण ध्रुवावर होणार सॉफ्ट लँडिंग

लँडर विक्रम सध्या चंद्राच्या अशा कक्षेत आहे, जिथे चंद्राचा सर्वात जवळचा पॉइंट २५ किमी आहे आणि सर्वात दूर १३४ किमी आहे. या कक्षेतून ते बुधवारी (२३ ऑगस्ट) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. आतापर्यंत कोणतेही मिशन दक्षिण ध्रुवावर पोहोचलेले नाही. यामुळेच इस्रोने चांद्रयान येथे पाठवले आहे.

लँडर विक्रम स्वयंचलित मोडमध्ये चंद्राच्या कक्षेत उतरत आहे. पुढची प्रक्रिया कशी असेल याचा निर्णय देखील ते स्वतःच घेत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर भारत हे यश मिळवणारा जगातील चौथा देश बनेल. आतापर्यंत फक्त अमेरिका, सोव्हिएत युनियन (सध्याचा रशिया) आणि चीन हे देशच हा कारनामा ​​करू शकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT