Chandrayaan-3 Launch eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 Launch : पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत किती वेळात पोहोचेल चांद्रयान-3? किती असेल रॉकेटचं स्पीड?

या मोहिमेसाठी भारताचं सर्वात मोठं रॉकेट 'फॅट बॉय' वापरण्यात येणार आहे.

Sudesh

चांद्रयान-३ च्या माध्यमातून इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून अवघ्या काही तासांमध्ये हे चांद्रयान अवकाशात झेप घेईल. यासाठी भारताचं सर्वात मोठं रॉकेट 'फॅट बॉय' वापरण्यात येणार आहे.

आज दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-३ लाँच केले जाईल. यासाठीचं काउंटडाऊन सुरू करण्यात आलं आहे. लाँच केल्यानंतर अवघ्या १६ मिनिटांमध्ये एलव्हीएम३ हे रॉकेट पृथ्वीच्या बाहेरील कक्षेमध्ये पोहोचेल.

किती असणार स्पीड?

आज दुपारी २.३५ वाजता रॉकेटचं बूस्टर लाँच केलं जाईल. यावेळी त्याचा वेग १,६२७ किलोमीटर प्रतितास एवढा असणार आहे. लाँच झाल्यानंतर १०८ सेकंदांनंतर हे रॉकेट ४५ किलोमीटर उंचीवर पोहोचेल. याठिकाणी त्याचं लिक्विड इंजिन सुरू होईल. (ISRO Chandrayaan-3)

पुढे ६२ किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर दोन्ही बूस्टर्स रॉकेटपासून वेगळे होतील. यानंतर रॉकेटचं स्पीड हे सुमारे ७ हजार किलोमीटर प्रतितास एवढी होईल. पुढे हळू-हळू हे रॉकेट आपल्या टॉप स्पीडला पोहोचेल. ३६ हजार किलोमीटर प्रतितास या वेगाने अवघ्या १६ मिनिटांमध्ये हे रॉकेट पृथ्वीच्या बाहेरील कक्षेत पोहोचेल.

४० दिवसात पोहोचणार चंद्रावर

पृथ्वीपासून चंद्र सुमारे ३.८४ लाख किलोमीटर दूर आहे. चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी चांद्रयानाला सुमारे ४० दिवसांचा कालावधी लागेल. २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्रावर उतरेल. मात्र, तेथील सूर्योदयाच्या वेळेनुसार यात बदल होऊ शकतो, असं इस्रोने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT