Chandrayaan-3 Launch eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 Launch : आज अंतराळात झेपावणार चांद्रयान-३; कधी अन् कुठे पाहता येईल लाईव्ह? जाणून घ्या

चांद्रयान-३चे प्रक्षेपण हा संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे.

Sudesh

भारताची तिसरी चंद्रमोहीम असणाऱ्या 'चांद्रयान-३'चं काउंट डाऊन सुरू झालं आहे. अवघ्या काही तासांमध्ये हे चांद्रयान अंतराळात झेप घेईल. संपूर्ण देशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. त्यामुळे, या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वच आतुर आहेत.

तुम्हालाही चांद्रयान-३ चे प्रक्षेपण लाईव्ह पाहायचे असेल, तर त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. टीव्हीवर जर तुम्हाला हे लाँचिंग पहायचं असेल, तर दूरदर्शनवर याचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. आज दुपारी २.३५ मिनिटांनी चांद्रयान-३ लाँच केलं जाईल.

इतर पर्याय

तुम्ही इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर (youtube.com/watch?v=q2ueCg) देखील या लाँचचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. यासोबतच इस्रोचं अधिकृत फेसबुक पेज (facebook.com/ISRO), आणि इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर (isro.gov.in) देखील याचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येईल.

महत्त्वाकांक्षी मोहीम

या मोहिमेच्या माध्यमातून भारत चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास, चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल. तर, चंद्राच्या दक्षिण भागात उतरणारा जगातील पहिलाच देश ठरण्याचा मान भारताला मिळणार आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरुन चांद्रयान-३ लाँच केले जाईल. यासाठी एलएमव्ही-३ या रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे. आज लाँच झाल्यानंतर २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्रावर लँड होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

GT vs RR Live : वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी! यशस्वी जैस्वालसोबत मोडला सेहवाग-गंभीरचा विक्रम, रिषभ पंतवरही केली कुरघोडी

Pune News: शाळेतील फी वाढ अन्यायकारक! पुण्यात पालकांचं आंदोलन; मनसेच्या आंदोलकांनी केली पैशांची उधळण

Latest Marathi News Live Update : जय पवार यांनी बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी

Pune Civic Negligence: पुण्यात बेमोसमी पावसानंतर धुळीचे लोट, रस्त्यावर खडी-मातीचा ढिगारा; महापालिका, ठेकेदारांच्या निष्क्रियतेने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT