Chandrayaan 3 eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 : ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारी पडला 'चांद्रयान-३' च्या रॉकेटचा भाग? इस्रोने दिलं स्पष्टीकरण

ही गोष्ट काय असू शकते याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Sudesh

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असणाऱ्या 'चांद्रयान-३'चं १४ जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण झालं. सध्या चांद्रयान पृथ्वीभोवतीच्या कक्षेत आहे. मात्र, या प्रक्षेपणानंतर काही दिवसांतच ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यावर एक रहस्यमयी वस्तू आढळून आली. या वस्तूची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

ऑस्ट्रेलियातील समुद्री किनाऱ्यावर आलेली ही वस्तू धातूची आहे. प्रथमदर्शनी ही वस्तू एखाद्या रॉकेटचा भाग असावा अशी दिसते. चांद्रयान-३ च्या लाँचनंतर ही वस्तू आढळून आल्यामुळे, हा चांद्रयानाच्या रॉकेटचा भाग असू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

ऑस्ट्रेलियाच्या स्पेस एजन्सीने ट्विट करत याबाबत माहिती दिली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील जुरियन बे वर मिळालेल्या या वस्तूची तपासणी सुरू आहे. ही वस्तू एखाद्या फॉरेन स्पेस लॉन्च व्हेईकलचा भाग असू शकते. याबाबत आम्ही जगभरातील अवकाश संशोधन संस्थांशी संपर्क साधत आहोत. अशा आशयाचं ट्विट या संस्थेने केलं होतं. यानंतर हा भाग सॉलिड रॉकेट मोटार केसिंग असल्याचं या संस्थेने स्पष्ट केलं होतं. मात्र, ही वस्तू कुठून आली याबाबत अजूनही तपास सुरू आहे.

दरम्यान, ही गोष्ट काय असू शकते याबाबत सोशल मीडियावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. काही जण याला इस्रोच्या चांद्रयान-३ प्रक्षेपणासाठी वापरलेल्या रॉकेटचा भाग म्हणत आहेत, तर काहींच्या मते हा चीन किंवा कोरियाच्या रॉकेटचा भाग असू शकतो. काही जण तर याला टायटन पाणबुडीचा भाग असल्याचंही म्हणत आहेत.

इस्रोचं स्पष्टीकरण

दरम्यान, इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की हा नक्कीच रॉकेटचा भाग वाटतो आहे. मात्र, हा इस्रोच्या रॉकेटचा भाग आहे, की अन्य एखाद्या रॉकेटचा हे स्पष्ट सांगता येत नाही. या वस्तूची तपासणी केल्यानंतरच नक्की काय ते सांगता येईल, असं सोमनाथ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT