Chandrayaan 3 Photo eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Photo : स्माईल प्लीज! 'प्रज्ञान रोव्हर'ने क्लिक केला 'विक्रम लँडर'चा फोटो; इस्रोने केला शेअर

ISRO Moon Mission : 'चांंद्रयान-3'च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे.

Sudesh

'चांद्रयान-3' बद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. चंद्रावर फिरत असलेल्या प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरचा खास फोटो क्लिक केला. इस्रोने एक्स (ट्विटर) पोस्ट करत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विक्रमचे दोन पेलोड देखील स्पष्ट दिसत आहेत.

"स्माईल प्लीज! प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरचा फोटो क्लिक केला. रोव्हरवर असणारा नेव्हिगेशन कॅमेऱ्याने (NavCam) हा फोटो टिपला आहे. LEOS म्हणजेच, लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टिम्स याठिकाणी चांद्रयान-3 चे नॅव्हकॅम तयार करण्यात आले आहेत." असं इस्रोने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

इस्रोने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसतंय, की आज सकाळी 7:35 वाजेच्या सुमारास हा फोटो क्लिक केला आहे. विक्रम लँडरसोबतच या फोटोमध्ये ChaSTE आणि ILSA हे दोन पेलोड देखील दिसत आहेत.

'प्रज्ञान'ने लावले मोठे शोध

प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर फिरण्यास सुरुवात केल्यापासून काही दिवसांमध्येच मोठे शोध लावले आहेत. या रोव्हरवर असणाऱ्या LIBS पेलोडने चंद्राच्या मातीत कित्येक मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. यामध्ये ऑक्सिजन, अ‍ॅल्युमिनिअम, सल्फर, कॅल्शियम, लोह, क्रोमियम आणि टायटॅनियमची उपस्थिती दर्शवली आहे. यासोबतच, याठिकाणी मँगनीज, सिलिकॉन अशा घटकांचा समावेश आहे.

हायड्रोजनचा शोध सुरू

चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजनचा शोध लावल्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर हायड्रोजनच्या शोधात आहे. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाणी तयार होतं. त्यामुळे चंद्रावर हायड्रोजन आढळल्यास पाण्याची निर्मिती होण्याचा ठोस पुरावा हाती लागणार आहे. यादृष्टीने प्रज्ञानचं संशोधन सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT