Chandrayaan 3 Landing esakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 Photos : लँडिंगसाठी चांद्रयान चंद्रावर शोधतंय जागा; 'इस्रो'ने केले फोटो शेअर

संतोष कानडे

ISRO Moon Mission : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. चांद्रयान आता काही तासांमध्ये चंद्रावर लँडिंग करेल. त्यासाठी ते एक सुरक्षित जागा शोधत आहे.

काल इस्रोने एक पोस्ट करत 'चांद्रयान-3'च्या लँडिंगची तारीख अन् वेळ सांगितली आहे. दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी हे लँडिंग होईल. सध्या चांद्रयान-3 सुस्थितीत असून, लँडिंगसाठी विक्रम सज्ज असल्याचंही इस्रोने स्पष्ट केलं.

अनेक अडथळ्यांचा सामना करीत चांद्रयान आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत आहे. चांद्रयानने यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत एकमेव देश ठरणार आहे. १७ ऑगस्टपासून लँडिंगची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

चांद्रयान-३ लक्ष्याच्या जवळ पाहोचलेलं असून सध्या ते लँडिंगसाठी जागा शोधत आहे. योग्य जागेची निवड केल्यानतंर चांद्रयानचं लँडिंग होईल. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या मोहिमेवर लागलं आहे. भारतासाठी ही एक मोठी अचिव्हमेंट असेल.(Latest Marathi News)

काल चांद्रयान-3 पूर्वीच रशियाचं लूना-25 हे चंद्राच्या दक्षिण भागात लँड होणार होतं. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे लूना 25 चं लँडर चंद्रावर क्रॅश झालं. यामुळे रशियाचं स्वप्न भंगलं आहे. केवळ रशियासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी ही एक दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता भारताच्या मोहिमेवर लागून राहिल्या आहेत.

लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेऱ्याच्या सहाय्याने चांद्रयान सध्या सुरक्षित जागा शोधत आहे. उतरताना दगड किंवा खोल खंदक नसेल अथवा इतर अडथळे बघूनच यान लँड करेल. अशी माहिती इस्रोने ट्वीट करुन दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT