Chandrayaan-3 K Sivan eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 : ...आणि ते हसले! 'चांद्रयान-3'च्या यशस्वी लँडिंगनंतर के. सिवान झाले खुश; पाहा व्हिडिओ

ISRO Moon Mission : 'चांद्रयान-3'च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे.

Sudesh

Chandrayaan-3 Mission : भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वीपणे पार पडली आहे. 'चांद्रयान-3'ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे. यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष होत आहे. मात्र, यामध्ये एका व्यक्तीला झालेला आनंद हा अनन्यसाधारण आहे.

ही व्यक्ती म्हणजे, इस्रोचे माजी प्रमुख के. सिवान. 'चांद्रयान-2' मोहिमेवेळी सिवान हे इस्रोचे प्रमुख होते. भारताची ही दुसरी चांद्रमोहीम होती. मात्र, हे चांद्रयान सॉफ्ट लँडिंग करण्यात अयशस्वी ठरले होते. यावेळी सिवान यांना अश्रू अनावर झाले होते. पंतप्रधान मोदींनी देखील सिवान यांना मिठी मारून, त्यांचे सांत्वन केले होते.

अखेर आज, 'चांद्रयान-3'ने चंद्रावर लँडिंग करून दाखवत नवा इतिहास रचला. यानंतर सिवान यांनी आपण अगदी आनंदी असल्याचं मत व्यक्त केलं. "आम्ही गेल्या चार वर्षांपासून या यशाची प्रतीक्षा करत होतो. संपूर्ण देशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. चांद्रयानाचं यशस्वीपणे लँडिंग झाल्यामुळे मी भरपूर आनंदी आहे. यासाठी मी संपूर्ण देशाचं अभिनंदन करतो." असं ते म्हणाले.

'चांद्रयान-3' जो डेटा कलेक्ट करेल, तो केवळ भारतासाठी नसणार आहे. संपूर्ण जगभरातील वैज्ञानिकांना याचा फायदा होणार आहे. या यशामुळे मी खरंच खूप आनंदी आहे, असंही सिवान यांनी स्पष्ट केलं. (ISRO Chandrayaan-3 Mission)

लाँचिंगवेळी झाली होती चर्चा

'चांद्रयान-3'च्या लाँचिंगवेळी के. सिवान हेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांच्या गंभीर चेहऱ्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. केवळ या व्यक्तीला हसताना पाहण्यासाठी तरी चांद्रयान-3 मोहीम यशस्वी व्हावी, असं मत कित्येक नेटिझन्सनी व्यक्त केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election: एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी मध्यरात्री मॅरेथॉन बैठक, काय ठरलं? महापालिका निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक!

Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने राजधानीत साहित्य, संस्कृतीचा जागर; साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT