Chandrayaan 3 Update eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 : पुढच्या सात दिवसांमध्ये संपणार 'चांद्रयान-3' मोहीम; लँडर-रोव्हर सुस्थितीत, मग काय आहे कारण?

Vikram Lander : 'चांद्रयान-3' मोहिमेची तीन मोठी उद्दिष्टे होती. यातील दोन उद्दिष्टं यशस्वीपणे पार पडली आहेत.

Sudesh

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम 'चांद्रयान-3' मोहीम संपूर्ण जगासाठी फायद्याची आणि प्रेरणादायी ठरत आहे. अत्यंत यशस्वी ठरलेली ही मोहीम, पुढील सात दिवसांमध्ये संपणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे सुस्थितीत असूनही, इस्रोने हा निर्णय घेतला आहे.

'चांद्रयान-3' मोहिमेची तीन मोठी उद्दिष्टे होती. यातील पहिलं उद्दिष्ट म्हणजे - चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणं. इस्रोने हे उद्दिष्ट यशस्वीपणे पार पाडलं. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर, अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरला. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पोहोचणारा भारत पहिलाच देश ठरला आहे.

या मोहिमेचं दुसरं उद्दिष्ट म्हणजे, प्रज्ञान रोव्हर चंद्रावर यशस्वीपणे डिप्लॉय करणे. हेदेखील इस्रोने यशस्वीपणे पार पाडलं. प्रज्ञान रोव्हर हे सध्या चंद्रावर फिरत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या खड्ड्यामधून ते यशस्वीपणे वाट काढत आहे.

या मोहिमेचं तिसरं उद्दिष्ट होतं, चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करुन संशोधन करणे. हे उद्दिष्ट काही प्रमाणात पार पडलं असून, प्रज्ञान रोव्हर आणखी संशोधन करत आहे. मात्र, यासाठी आता प्रज्ञानकडे केवळ सात दिवसांचा वेळ बाकी आहे.

चांद्रयान-3 मोहिमेचा कालावधी हा केवळ 14 दिवसांचा असणार आहे, असं इस्रोने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. 23 तारखेला सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर ही वेळ सुरू होणार होती. यानंतर आता सात दिवस पूर्ण झाले असून, केवळ सात दिवस बाकी आहेत. हा कालावधी आणखी एका दिवसाने वाढू शकतो, मात्र यासाठी लँडर आणि रोव्हरमध्ये पुरेशी पॉवर शिल्लक असणं गरजेचं आहे.

चंद्रावरील सूर्यप्रकाश महत्त्वाचा

ही मोहीम अवघ्या 14 दिवसांची असण्याला चंद्रावरील सूर्यप्रकाश कारणीभूत आहे. चंद्रावरील एक पूर्ण दिवस हा पृथ्वीवरील 28 दिवसांएवढा असतो. म्हणजेच, चंद्रावर 14 दिवस सातत्याने सूर्यप्रकाश असतो, आणि 14 दिवस अंधार. विक्रम लँडर ज्या दिवशी चंद्रावर उतरले, त्या दिवशी चंद्रावर सूर्योदय झाला होता. म्हणजेच, तिथून पुढे 14 दिवस चंद्रावर सूर्यप्रकाश असणार आहे.

प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरमध्ये असलेली उपकरणे ही पूर्णपणे सोलार-पॉवर्ड आहेत. म्हणजेच, सूर्यप्रकाश नसेल तर ही उपकरणे चालू शकणार नाहीत. यामुळेच या मोहिमेची मुदत ही पृथ्वीवरील 14 दिवस एवढी ठेवण्यात आली आहे.

आतापर्यंत काय शोधलं?

चांद्रयान-3 ने आतापर्यंत चंद्रावर महत्त्वाचे शोध लावले आहेत. विक्रम लँडरवर असणाऱ्या ChaSTE पेलो़डने चंद्राच्या मातीच्या तापमानाचा अभ्यास केला आहे. पृष्ठभागावर असणारं तापमान आणि थोड्या खोलीवरील तापमान यात भरपूर तफावत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

तर प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर ऑक्सिजन, सल्फर आणि इतर मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. यामध्ये अ‍ॅल्युमिनिअम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मँगनीज आणि सिलिकॉन अशा घटकांचा समावेश आहे. सध्या प्रज्ञान रोव्हर हायड्रोजनचा शोध घेत आहे. चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वासाठी हा शोध महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT