Chandrayaan-3 Update eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 Update : पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं चांद्रयान-3; इस्रोने ट्विट करत दिली माहिती

इस्रोने ट्विट करत चांद्रयान-3 बद्दल लेटेस्ट माहिती दिली आहे.

Sudesh

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. सध्या हे चांद्रयान पृथ्वीभोवती कक्षेमध्ये फिरत आहे. पृथ्वीभोवती पाच फेऱ्या मारल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. आज या चांद्रयानाला चौथ्या कक्षेतून पाचव्या कक्षेत यशस्वीपणे ढकलण्यात आलं. (Chandrayaan-3 Mission)

पृथ्वीभोवती शेवटची फेरी

पाचव्या कक्षेत ढकलण्यात आल्यानंतर काही वेळातच हे चांद्रयान पृथ्वीपासून 1,27,609 किलोमीटर बाय 236 किलोमीटरच्या कक्षेत पोहोचेल. सध्या या यानाची स्थिती उत्तम असून, त्याची रेडियस काही चाचण्यांनंतर निश्चित सांगण्यात येईल. इस्रोने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

पुढची फायरिंग 1 ऑगस्टला

यानंतर एक ऑगस्ट रोजी हे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यावेळी इस्रोकडून चांद्रयान-3 ला शेवटचा पुश देण्यात येईल. या टप्प्याला ट्रान्सलुनार इंजेक्शन असं म्हटलं जातं. एक ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजेदरम्यान ही क्रिया पार पडेल. (ISRO Chandrayaan-3)

चंद्राभोवतीही मारणार फेऱ्या

चंद्राजवळ पोहोचल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. यासाठी ते चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीच्या कक्षेत स्थिरावण्यात येईल. यासाठी पृथ्वीच्या कक्षेतून ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बाहेर पाठवण्यात आलं, त्याच्या अगदी उलट पद्धतीने चंद्राच्या कक्षेत ते प्रवास करेल.

सर्व काही व्यवस्थित पार पडल्यास, २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्रावर लँडिंग करु शकेल असं इस्रोने स्पष्ट केलं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT