Chandrayaan 3 Update eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Update : चंद्रावर कसं उतरलं प्रज्ञान रोव्हर? इस्रोने पोस्ट केला 'चांद्रयान-3'चा नवा व्हिडिओ

Pragyan Rover : चांद्रयान-3 बाबत एक नवी अपडेट समोर आली आहे.

Sudesh

ISRO Moon Mission : चांद्रयान-3 बाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. प्रज्ञान रोव्हर हे चंद्रावर कशा प्रकारे उतरलं, याचा व्हिडिओ इस्रोने शेअर केला आहे. एक्स पोस्टमधून इस्रोने ही माहिती दिली आहे.

विक्रम लँडरमधील लँडर मॉड्यूल कॅमेऱ्याने काढलेला हा व्हिडिओ आहे. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:04 मिनिटांनी 'चांद्रयान-3'ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केलं होतं. यानंतर काही तासांनी त्यातून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडलं होते. प्रज्ञान रोव्हर हे चंद्रावर विविध प्रकारचे संशोधन पार पाडणार आहे.

दरम्यान, काल (24 ऑगस्ट) रात्री देखील इस्रोने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. लँडर मॉड्यूल हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या थोडा पूर्वीचा हा व्हिडिओ होता. याच व्हिडिओच्या थ्रेडमध्ये इस्रोने आज नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे.

भारताने रचला इतिहास

चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे फत्ते करून भारताने नवा इतिहास रचला आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिलाच देश ठरण्याचा विक्रम भारताच्या नावे झाला आहे. चांद्रयान-3 हे चंद्रावर 14 दिवस विविध प्रकारचे संशोधन करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT