S Somnath on Chandrayaan 3 eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 : …तर नष्ट होऊ शकतं विक्रम लँडर अन् प्रज्ञान रोव्हर! एस. सोमनाथ यांनी व्यक्त केली भीती

S Somnath : चांद्रयान-3 समोरील आव्हानं अजून संपली नसल्याचं एस. सोमनाथ म्हणाले आहेत.

Sudesh

'चांद्रयान-3' ही मोहीम भारताने यशस्वीपणे पार पाडली आहे. एवढंच नाही, तर या माध्यमातून भारताने कित्येक नवे विक्रमही प्रस्थापित केले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. आता प्रज्ञान रोव्हरने लँडर मॉड्यूलमधून बाहेर येऊन आपलं कामही सुरू केलं आहे.

23 ऑगस्टला सायंकाळी 6:04 वाजता लँडर मॉड्यूल हे चंद्रावर उतरलं. यामुळे या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला. आता प्रज्ञान रोव्हर चंद्रावर पुढील संशोधन करणार आहे. मात्र, असं असलं तरी चांद्रयान-3 समोरील आव्हानं संपलीत असं नाही.

भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली. ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. ते म्हणाले, "विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांची प्रकृती अगदी उत्तम आहे. सर्व सिस्टीम्स चांगल्या प्रकारे काम करत आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यापुढील आव्हानं संपली आहेत."

"चंद्रावर कोणत्याही प्रकारचं वातावरण उपलब्ध नाही, त्यामुळे अवकाशातून एखादी वस्तू चंद्राच्या या भागात कोसळली; तर ती थेट चांद्रयान-3 ला धडकू शकते. यामध्य मग एखादा अ‍ॅस्ट्रॉईड, स्पेस कचरा किंवा अन्य गोष्टींचा समावेश आहे. अशी एखादी गोष्ट चांद्रयानाच्या लँडर किंवा रोव्हरला धडकली, तर ते नष्ट होऊ शकतात" असं सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.

आता सूर्यावर घेणार झेप

चांद्रयान-3 च्या यशानंतर आता इस्रो आपल्या पहिल्या सौरमोहिमेसाठी सज्ज होत आहे. 'आदित्य एल-1' असं या मोहिमेचं नाव आहे. आदित्य उपग्रहाला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून लाँच करण्यात येईल. त्यानंतर अंतराळातील 'एल-1' या पॉईंटवर ते डिप्लॉय करण्यात येईल. इथून आदित्य सूर्याचा अभ्यास करेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हापूसला आंब्याला लेबल लागणार? महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी

Yavatmal Crime News : नग्न करून अमानुष मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Mumbai News: ११३ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहासजमा! पूर्व-पश्चिम जोडणारा नवीन दुवा लवकरच आकारास येणार

आखाती युद्धाचा कांद्याला मोठा फटका; निर्यात ४५ टक्के घसरली, दर कोसळल्याने शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT