Chandrayaan 3 Update eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 Update : विक्रम लँडरची पहिली डी-बूस्टिंग प्रक्रिया यशस्वी; चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं 'चांद्रयान-3'

Vikram Lander : या माध्यमातून विक्रम लँडरचा वेग सुरक्षितपणे कमी करण्यात इस्रोला यश मिळालं आहे.

Sudesh

ISRO Moon Mission : भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम 'चांद्रयान 3' अगदी यशस्वीपणे पुढे जात आहे. गुरुवारी (17 ऑगस्ट) चांद्रयानाचं प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल हे एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर आज (18 ऑगस्ट) सायंकाळी 3:50 वाजता लँडर मॉड्यूलच्या डी-बूस्टिंगची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

इस्रोने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन याबाबत माहिती दिली. डी-बूस्टिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सध्या लँडर मॉड्यूल हे चंद्रापासून 113x157 किलोमीटर कक्षेत पोहोचलं आहे. यानंतर पुढील डी-बूस्टिंग प्रक्रिया ही 20 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे. चांद्रयान-3 हे सुस्थितीत असून, यशस्वीपणे प्रवास करत आहे.

विक्रम लँडर सध्या चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होण्याची तयारी करत आहे. याचाच पहिला टप्पा म्हणून त्याचा वेग कमी करणं गरजेचं होतं. या प्रक्रियेलाच डी-बूस्टिंग म्हणतात. हे डी-बूस्टिंग दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. याचा पहिला टप्पा आज यशस्वीपणे पार पडला. (ISRO)

कसा असणार पुढचा प्रवास?

लँडर मॉड्यूलमध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोन्हीचा समावेश आहे. विक्रम लँडर हे टप्प्याटप्प्याने चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ नेण्यात येईल. त्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ नियोजित जागेत याचं लँडिंग करण्यात येईल. यानंतर प्रज्ञान रोव्हर हे चंद्रावर उतरून आवश्यक माहिती गोळा करणार आहे.

14 जुलै रोजी चांद्रयान-3 हे प्रक्षेपित करण्यात आलं होतं. यानंतर कित्येक दिवसांचा खडतर प्रवास करून ते चंद्राजवळ पोहोचलं आहे. सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्यास 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT