Chandrayaan 3 ISRO S Somnath eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 : फेल होणार नाही 'चांद्रयान-3', इंजिन-सेन्सर बंद पडले तरीही लँडिंग शक्य! इस्रो प्रमुखांची माहिती

ISRO Moon Mission : आज 'चांद्रयान-3'चं दुसरं डी-बूस्टिंग पार पाडण्यात आलं.

Sudesh

Chandrayaan-3 Update : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज 'चांद्रयान-3'चं दुसरं डी-बूस्टिंग पार पाडण्यात आलं. यानंतर आता थेट 23 तारखेला विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करेल. या दरम्यान, चंद्राच्या कक्षेत असणाऱ्या रशियाच्या 'लूना 25'ला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

सोमवारी लँडिंगच्या तयारीत असलेल्या 'लूना 25'मध्ये शनिवारी काही तांत्रिक अडचणी दिसून आल्या. त्यामुळे, याचं वेळेत लँडिग होईल का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सोबतच, 'चांद्रयान-3'च्या बाबतीत देखील असं होऊ शकतं का? तसंच चांद्रयानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास काय? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.

चांद्रयानाला धोका नाही

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी या प्रश्नांची उत्तरं आधीच दिली आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं होतं, की चांद्रयान-3 मधील दोन्ही इंजिन आणि सर्व सेन्सर बंद पडले, तरीही विक्रम हे यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग करू शकणार आहे. 'चांद्रयान-3'चं डिझाईनच या शक्यता लक्षात घेऊन करण्यात आलं आहे.

"जरी सर्व काही फेल झालं, दोन्ही इंजिन आणि सर्व सेन्सर बंद झाले, कोणतीच गोष्ट काम करत नसली; तरीही विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी सक्षम आहे. अर्थात, यासाठी केवळ त्यातील प्रॉपल्शन सिस्टीम कार्यरत असणे गरजेचं आहे." असं सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.

चांद्रयान-२ मधून घेतले धडे

इस्रोने यापूर्वीच सांगितलं आहे, की 'चांद्रयान-3'चं डिझाईन हे 'चांद्रयान-2'च्या चुकांमधून शिकून तयार केलं आहे. चांद्रयान-२ ही मोहीम अगदी अंतिम टप्प्यात जाऊन अयशस्वी झाली होती. मात्र, त्यातूनच धडा घेत पुढच्या मोहिमेत इस्रोने 'फेल्युअर बेस्ड' डिझाईन तयार केलं. यामुळेच चांद्रयान-3 च्या यशाबाबत इस्रोला अधिक खात्री आहे.

आता प्रतीक्षा लँडिंगची

दरम्यान, 'चांद्रयान-3'ची शेवटची डी-बूस्टिंग प्रक्रिया रविवारी पहाटे पार पडली. यानंतर चांद्रयान हे चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 25 किलोमीटर उंचीवर आहे. यानंतर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT