characteristics of black color kolhapur 
विज्ञान-तंत्र

काळ्या रंगाची 'ही' आहेत वैशिष्ट्ये... जाणुन घ्या...

शिल्पा देगावकर, कोल्हापूर

पुराणातील गोष्टी, चित्रपट, पुस्तके, प्रिंट मीडिया आणि टेलिव्हिजन यांमधून सामान्यत: पांढऱ्यामध्ये चांगला माणूस आणि काळ्या रंगात वाईट माणूस, असेच आपल्या मनावर बिंबविले गेले आहे. चांगले-वाईट, चूक-बरोबर, सत्य-असत्याच्या पारड्यात पांढरा आणि काळा रंग अगदी प्रामाणिकपणे प्रत्येकाकडूनच तोलला जातो हे मात्र खरं!

ब्लॅकलिस्ट, ब्लॅकमेल, ब्लॅकआउट, ब्लॅक मार्केट, ब्लॅक मॅजिक, हे शब्द तसे परिचयाचे. ते काय दर्शवितात? अंधार, रात्र, भीती, काहीतरी अघटित घडेल का असे विचार, गूढता, मृत्यू, वाईट आणि आक्रमकता, अवैध व्यापार, चुकीच्या गोष्टी, ब्लॅक- हो काळाच. काळा हा एक अनाकलनीय रंग आहे. रंगाची अनुपस्थिती म्हणजे काळा रंग, तसा भयानक, मृत्यू, विनाश, प्रलय, भीती, गांभीर्य, दुर्दैवीपणाचे आणि दुःखाचे प्रतिनिधित्व करतो. काळा हा सामान्यत: सामर्थ्य, अधिकार, अज्ञान किंवा नकारात्मकता, बंडखोरीशी संबंधित आहे. काळा हा शोक आणि दुः खाचा रंग आहे.
एखादी कंपनी इंद्रधनुष्याच्या सर्व रंगांसह लोगो डिझाइन करू शकते; परंतु आयकॉनिक काजळ, डिस्नी Gucci, Prada, Michael Kors, Coach, Cartier यांचे लोगो पाहिले, तर ते ब्लॅक अँड व्हाईट. समजायला सुटसुटीत, पटकन ओळखता येऊ शकतात. ब्लॅक लोगो ज्या कंपनी वापरतात त्या त्यांची शक्ती, अधिकार, दृष्टिकोन, संपन्नता आणि भरभराट दर्शवू पाहतात. त्याचबरोबर संपूर्ण औपचारिक किंवा व्यावसायिक उद्योजक असल्याचे स्पष्ट करतात. उत्पादनाचा दर्जा त्यांना अतिशय महत्त्वाचा असतो. त्याबाबत कसलीही जोखीम न घेण्याची इच्छा स्पष्ट होते. काळ्या रंगाचा वापर सामान्यत: तरुणांना आणि उच्च श्रेणीतील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी केला.

'काळा हा एक रंग आहे, ज्याचा गांभीर्याने विचार केला जातो' असे फॅशन तज्ज्ञ कॅरेन हॅलर म्हणतात. फॅशनच्या जगात काळ्या रंगाला विशिष्ट स्थान आहेच. मानसशास्त्र क्षेत्रातील संशोधनानुसार, ज्या लोकांना काळ्या रंगाचे कपडे घालायला आवडतात, ते लोक महत्त्वाकांक्षी, संवेदनशील असतात. नियमानुसार, ते भावनिक आणि सहज उत्साही असतात, त्यांची प्रत्येक कृती हेतूपूर्ण आणि अर्थपूर्ण असते. आपण भावनिक किंवा संवेदनशील आहे, हे मान्य नसते आणि म्हणूनच बरेचदा ते लपविण्याचा प्रयत्न करतात. बाह्य दिखाव्यापेक्षा व्यक्तीचे गुण त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात.
ब्लॅक बेल्ट-मार्शल आर्टमधील तज्ज्ञ पातळी 'मेन इन ब्लॅक'- सरकारी एजंट ऑफिसर 'ब्लॅक टाय' औपचारिक कार्यक्रम किंवा ड्रेस कोड, 'इन द ब्लॅक' चांगल्या पद्धतीने, नफा मिळवून देणारे काम किंवा व्यवसाय इत्यादी काळ्याशी संबंधित वापरले जाणारे काही शब्दप्रयोग. अधिकृतता औपचारिकता, प्रतिष्ठा, सर्वोच्च पातळी, अभिजात, व्यावसायिक, मादक, मोहक, अत्याधुनिकता सूचित करणारा तोच तो काळा रंग. आर्ट किंवा फोटोग्राफीच्या गॅलरीसाठी डिझाइन करताना, इतर रंग स्पष्ट दिसावे, यासाठी काळा किंवा राखाडी पार्श्वभूमीसाठी निवडला जातो. खोलीस काळा रंग दिला, तर ती आहे त्यापेक्षा लहान वाटते. इतर डार्क रंगांप्रमाणे काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये व्यक्ती बारीक वाटते. कळत नकळत आत्मविश्वास वाढतो. कोणत्याही रंगाबरोबर काळा मोहकच दिसतो, खास करून केशरी, गुलाबी, आकाशी, हिरवा, पांढरा, लाल, पिवळा इत्यादी. निसर्गचित्र असो, एखादे पेंटिंग असो वा फोटोग्राफ shadows, D इफेक्‍ट देण्यासाठी काळा रंग खूप महत्त्वाचा ठरतो. बऱ्याच युरोपिअन विद्यापीठांमध्ये, शाळांमधून पदव्युत्तर युनिफॉर्म ब्लॅक ब्लेझर दिसून येते. पदवीदान समारंभाचे कोणाचेही फोटो पहिले, तर त्या विद्यार्थ्याने काळा ओव्हरकोट परिधान केलेला दिसतो. ब्लॅक मर्सिडीजची शान काही निराळीच. थोडक्‍यात काय रंगाचा रंग सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम करू शकतो. त्यातलं मी काय स्वीकारणार ते मलाच ठरवायला हवं, नाही का?

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मूळ ओबीसींनाच तिकीट, भाजपसोबत जायचं नाही; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शरद पवारांनी दिल्या सूचना

School Bus Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! स्कूल बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली; १ विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी

सॅनिटरी पॅडमध्ये लपलेलं 'हे' काय आहे? "तुमचं पॅड खरंच स्वच्छ आहे का?" उजेडात दिसलं धक्कादायक सत्य... जगभरात व्हिडिओ होताय व्हायरल

AI Whatsapp Chatbot: आता व्हॉइस नोटद्वारे तक्रार करता येणार, दिव्यांगांसाठी ‘एआय व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवा विकसित; कसं चालणार?

२४ वर्षीय तरुणाचे ३८ वर्षीय विवाहितेशी प्रेमसंबंध, दोघांनी एकाच दोरीनं संपवलं आयुष्य; घातपाताचाही संशय?

SCROLL FOR NEXT