Cheap Laptops List esakal
विज्ञान-तंत्र

Cheap Laptops List : 15 हजाराच्या आत पण मिळतो बेस्ट लॅपटॉप, लिस्ट एकदा पहाच!

तुम्हाला स्वत:साठी बेस्ट प्रोसेसर असलेला लॅपटॉप घ्यायचा असेल तर हे नक्की वाचा

Pooja Karande-Kadam

Cheap Laptops List : लॅपटॉपच्या मदतीने ऑफिस प्रोजेक्ट्सपासून ते शाळेच्या अभ्यासापर्यंतची सर्व कामे अगदी सोपी होतात. तुम्ही त्यांना कुठेही घेऊन जाऊ शकता. जर तुम्हाला स्वत:साठी बेस्ट प्रोसेसर असलेला लॅपटॉप घ्यायचा असेल तर काही बेस्ट लॅपटॉप नक्की पहा.

अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत लॅपटॉपची गरज पडते. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या देखील एकापेक्षा एक शानदार लॅपटॉप्स बाजारात सादर करत आहेत. विशेष म्हणजे या लॅपटॉप्सची किंमत देखील कमी आहे.

तुम्ही देखील नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये येणारे काही चांगले पर्याय सूचवत आहोत. हे लॅपटॉप उत्कृष्ट वर्क परफॉर्मन्सचे असून त्यात ८ जीबीपर्यंत रॅम मिळत आहे. फास्ट प्रोसेसिंगसाठी तुम्ही या लॅपटॉपचा वापर करू शकता.

इतका महत्त्वाचा असलेला लॅपटॉप खरेदी करायचं म्हटलं की तो कोणत्या कंपनीचा घ्यावा. सगळ्यात कमी किंमतीत चांगला लॅपटॉप मिळेल का? असे प्रश्न विचारले जातात. चांगला लॅपटॉप शोधताना मोठी किंमतही येते.

लॅपटॉप प्रत्येक रेंजमध्ये येतात आणि आम्ही पाहिले आहे की त्यांची किंमत सहसा२५,००० रुपयांपेक्षा जास्त असते. पण आज आम्ही तुमच्यासाठी असे काही लॅपटॉप घेऊन आलो आहोत, ज्यांची किंमत १५,००० च्या रेंजमध्ये आहे आणि ते तुमची सर्व कामे अगदी सोपी करतील.  

Lenovo Slim 3 Chromebook 

 इंटेल सेलेरॉन ड्युअल कोर लॅपटॉप अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत घरी आणता येतील. यावर ६० टक्के सूट दिली जात आहे. हा लॅपटॉप फ्लिपकार्टवर ३९ हजार रूपयांपैकी फक्त १५,००० रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफर अंतर्गत १५,३५० रुपयांची सूटही दिली जात आहे. हा लॅपटॉप ४ जीबी रॅम आणि १ वर्षाच्या ऑनसाइट वॉरंटीसह येतो.

Asus Chromebook Touch Intel Celeron 

इंटेल सेलेरॉन ड्युअल कोर लॅपटॉप फ्लिपकार्टवरून ४६% दराने खरेदी करता येईल. हा लॅपटॉप २९,९९० रुपयांऐवजी फक्त १५,९९० रुपयांना घरी आणता येईल.

जर तुमच्याकडे जुना लॅपटॉप असेल तर एक्सचेंज ऑफरवर तुम्ही तो घरी आणू शकता, ज्यावर तुम्हाला १५,३५० रुपयांची सूट मिळेल. यात ४ जीबी रॅम, क्रोम ऑपरेटिंग सिस्टिम आहे. तसेच यात टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १ वर्षांची ऑनसाइट वॉरंटी देण्यात आली आहे.  

Asus Chromebook Flip Touch Celeron Dual Core

ग्राहक हा लॅपटॉप अर्ध्या किमतीत म्हणजेच ५० टक्के सवलतीत खरेदी करू शकतात. यंदाची ही सर्वात कमी किंमत असल्याचे बोलले जात आहे.

ग्राहक फ्लिपकार्टवरून २९,९९० रुपयांऐवजी केवळ १४,९९० रुपयांमध्ये घरी आणू शकतात. विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफर अंतर्गत याला १४,४५० रुपयांच्या डिस्काउंटवर खरेदी करता येईल. यात ११.६ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले असून ४ जीबी रॅम देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT