Jio Google
विज्ञान-तंत्र

जिओचे सर्वात स्वस्त प्लॅन, 4 रुपयांपेक्षा कमीत मिळतो 1GB डेटा

सकाळ डिजिटल टीम

रिलायन्स जिओ कडून त्यांच्या ग्राहकांना नेहमीच इतरांपेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर दिल्या जातात. जिओचे असे अनेक प्लॅन्स आहेत ज्यात तुम्हाला 4 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 1GB डेटा मिळतो. हे सगळे प्लॅन हे जास्त कालावधीसाठी देण्यात येतात. या प्लॅनची वैधता किमान 56 दिवस आहे. या सर्व प्लॅन्समध्ये फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळातात. आज आपण रिलायन्स जिओच्या अशा 5 प्रीपेड प्लॅन्सद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये सर्वात स्वस्त 1 जीबी डेटा दिला जातो.

3,499 रुपयांचा प्लॅन

हा जिओचा लॉंग टर्म प्रीपेड प्लान आहे ज्यामध्ये तुम्हाला 365 दिवस दररोज ३ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 1095GB डेटा मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग अनलिमीटेड आहे आणि ग्राहकांना दररोज 100 एसएमएस देखील मिळतात.

2,399 रुपयांचा प्लॅन

हा देखील एक लॉंग टर्म प्लॅन आहे ज्यामध्ये ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा ऑफर केला जातो, याचा अर्थ तुम्हाला एकूण 730 जीबी डेटा मिळणारा आहे आणि याची प्रति जीबी किंमत ही 3.228 रुपये इतकी पडते.

599 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची व्हॅलिडीटी ही 84 दिवसांची आहे आणि या मध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा दिला जातो . या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांसाठी उपलब्ध एकूण 168GB डेटा दिला जातो. ज्यामुळे प्रति एक GB डेटासाठी तुम्हाला 3.5 रुपये किंमत मोजावी लागते.

999 रुपयांचा प्लॅन

हा देखील आणखी एक 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे, या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 3GB डेटा देण्यात योतो. म्हणजेच वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये एकूण 252GB डेटा मिळतो ज्यामध्ये प्रति एक GB डेटासाठी तुम्हाला 3.9 रुपये पडतात.

444 रुपयांचा प्लॅन

हा एक कमी कालावधीसाठीचा प्लान आहे ज्यामध्ये तुम्हाला 56 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते तसेच तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजेच वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये एकूण 112GB डेटा मिळतो, ज्यामुळे प्रति एक GB डेटाची किंमत 3.9 रुपये पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT