cheapest 7 seater car datsun go  
विज्ञान-तंत्र

मोठ्या कुटुबांसाठी बेस्ट 7 सीटर कार, किंमत देखील आहे बजेटमध्ये

सकाळ डिजिटल टीम

भारतीय बाजारपेठेत एमपीव्ही (MPV) वाहनांना अधिक प्राधान्य दिले जाते. MPV म्हणजे मल्टी पर्पज व्हेकल (Multi Pulpous Vehicle). या कारमध्ये 5-6 लोक सहज बसू शकतात. तुमचेही कुटुंब मोठे असेल आणि तुम्ही अशा कारच्या शोधात असाल, जी 5 लाखांच्या आत असेल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही सर्वोत्तम असेल, तर आज आपण अशाच काही कारबद्दस जाणून घेऊया ज्या देशातील सर्वात स्वस्त MPV कार्स आहेत

मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco)

मारुती सुझुकी इको या यादीतील पहिली कार आहे. या कारमध्ये तुम्हाला चांगली स्पेस मिळेल आणि त्याचवेळी ती सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसते. Eeco मध्ये तुम्हाला 1.2-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 73bhp ची पॉवर आणि 101Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. किमतीबद्दल बोलायचे झाले तर मारुती सुझुकी Eeco भारतीय बाजारात 4.08 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये खरेदी केली जाऊ शकते.

डॅटसन गो प्लस (Datsun Go Plus)

डॅटसन गो प्लसला भारतीय बाजारपेठेत खूप पसंती दिली जात आहे. हे एक अशी MPV गाडी जी तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार अनेक प्रकारे वापरू शकता. यामध्ये देण्यात आलेल्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 198 cc 3 सिलेंडर इन लाइन 4 वाल्व DOHC पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यात अँटी लॉक ब्रेकिंग, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज इत्यादी फीचर्स देखील आहेत. तुम्ही ही MVP 4.25 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) खरेदी करू शकता.

Renault Triber

Renault Triber हा देखील एक चांगला ऑप्शन बाजारात उपलब्ध आहे, या गाडीला देखील बाजारात चांगली मागणी आहे, कंपनीने ही कार एकूण 4 व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. इंजिन बद्दल बोलायचे झाल्यास या गाडीत तुम्हाला 999cc चे 3-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 2 bhp पॉवर आणि 96 nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या कारच्या इंजिनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही ही कार 4.25 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT