Aadhaar Safety Tips UIDAI Authentication History tool esakal
विज्ञान-तंत्र

Aadhaar Safety Tips : तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? तुमच्या नकळत दुसरं कुणी वापरत नाही ना, मिनिटांत 'या' लिंकवरुन करा चेक

Aadhaar Safety Tips UIDAI Authentication History tool : आधारचा चुकीचा वापर टाळण्यासाठी UIDAI च्या "ऑथेंटिकेशन हिस्ट्री"द्वारे आधारची माहिती सुरक्षित ठेऊ शकता. कसे ते जाणून घेऊया सविस्तर.

Saisimran Ghashi

Aadhaar Card Safety Tips : आधार कार्ड आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रवास, शिक्षण, बँक खातं उघडणे, आणि सरकारी सेवा वापरणे यासाठी आपला १२ अंकांचा आधार क्रमांक अनिवार्य बनला आहे. आधारचा वापर जितका वाढला आहे, तितका तो फसव्या व्यक्तींच्या दृष्टीने महत्वाचा बनला आहे. त्यामुळे आधार नंबरच्या दुरुपयोगापासून स्वतःला सुरक्षित ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

आधारचा दुरुपयोग होतो का? हे तपासण्यासाठी UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने "ऑथेंटिकेशन हिस्ट्री" नावाचं एक साधन उपलब्ध केलं आहे. हे साधन वापरून आपण आपल्या आधार क्रमांकाच्या वापराची माहिती तपासू शकता आणि जर काही शंका निर्माण झाली तर आपण तात्काळ तक्रार करू शकता.

आधार वापर कसा तपासावा?

१. myAadhaar पोर्टलवर जा
आधी UIDAI च्या अधिकृत myAadhaar पोर्टलवर जा.

२. OTP वापरून लॉगिन करा
आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर "Login With OTP" वर क्लिक करा आणि आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका.

३. ऑथेंटिकेशन हिस्ट्री पाहा
"Authentication History" पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तारखा निवडा आणि त्या कालावधीत आधार कसा वापरला गेला आहे ते पाहा.

४. व्यवहारांची तपासणी करा
यादीतून आपल्याला जेवढे व्यवहार दिसतील त्यातील कोणतेही माहिती नसलेले किंवा संशयास्पद असल्यास त्वरित यासाठी तक्रार करा.

अनधिकृत वापराची तक्रार कशी करावी?

जर आपल्याला आधार वापरातील कोणतेही अनधिकृत व्यवहार आढळले तर-

  • UIDAI च्या टोल-फ्री हेल्पलाइन 1947 वर कॉल करा.

  • आपले शंका help@uidai.gov.in या ईमेल आयडीवर पाठवा.

आधार बायोमेट्रिक्स लॉक करा

आधारचा दुरुपयोग रोखण्यासाठी UIDAI एक अत्यंत महत्त्वाची सुविधा देत आहे. ज्याद्वारे आपण आपल्या आधार बायोमेट्रिक्सला लॉक करू शकता. यामुळे जरी कोणी आपला आधार क्रमांक मिळवला तरी आपला बायोमेट्रिक डेटा त्यांच्यासाठी वापरता येणार नाही.

आधार बायोमेट्रिक्स लॉक कसे करावे?

१. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि "Lock/Unlock Biometrics" या सेक्शनला जा.

२. तुमचा व्हर्च्युअल आयडी (VID), नाव, पिन कोड, आणि कॅप्चा कोड भरा.

३. ओटीपी वापरून प्रमाणीकरण करा आणि "Send OTP" क्लिक करा. नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल.

४. त्यानंतर तुमच्या बायोमेट्रिक्सला लॉक करा.

आधार हा आपला महत्त्वाचा ओळखपत्र असला तरी त्याच्या वापराबद्दल सतर्कता बाळगणं आवश्यक आहे. UIDAI वापरकर्त्यांना वेळोवेळी आधार माहिती अपडेट ठेवण्याचा सल्ला देते. जसे की मोबाईल नंबर, पत्ता, आणि बायोमेट्रिक ही सर्व माहिती. विशेषतः जे लोक १० वर्षांपासून आधार अपडेट करत नाहीत, अपघातामुळे त्यांचा बायोमेट्रिक डेटा प्रभावित झाला आहे, किंवा १५ वर्षांचा मुलांचा आधार अपडेट केला नाही त्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

आपला आधार सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे तपासणी करा आणि ज्या कोणत्याही अनधिकृत वापराची शंका आल्यास त्याची त्वरित तक्रार करा. यामुळे तुमच्या आधारचा चुकीचा वापर टाळता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT