bsnl plan 
विज्ञान-तंत्र

BSNLचा 107 रुपयांचा प्लॅन; मिळते 90 दिवस व्हॅलिडीटी अन् बरंच काही

सकाळ डिजिटल टीम

BSNL Prepaid Plans : अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत ज्यामुळे अनेक प्रीपेड प्लॅन्स महागले आहेत. दरम्यान बऱ्याचदा प्लॅन संपण्याआधीच डेटा संपून जातो अशावेळी आपल्याला डेटासाठी व्हावचर्स घ्यावे लागतात. मात्र भारत संचार टेलिकॉम लिमिटेड (BSNL) डेटा व्हाउचरमध्ये ग्राहकांना डेटा सोबतच इतरही अनेक फायदे देते. आज आपण अशाच एका BSNL प्रीपेड प्लॅनबद्दल जाणून घेऊ.

BSNL चा 107 रुपयांचा रीचार्ज प्लॅन

या BSNL प्लॅनमध्ये एकूण 10GB डेटा देण्यात आला आहे. हा डेटा फक्त 30 दिवसांसाठी वापरला जाऊ शकतो. तसेच व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. कॉलिंगचे फायदे फक्त 24 दिवसांसाठी मिळतात. या BSNL रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 मोफत SMS देखील दिले जात आहेत. तर दुसरीकडे, जर आपण एकूण वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनच्या रिचार्जवर, इनकमिंग कॉल्सचा लाभ जास्त कालावधीसाठी घेता येतो.

इतर कंपन्यांचे प्लॅन या सरखे प्लॅन्स

Airtel चा 129 रुपयांचा प्लॅन

Airtel प्लॅनमध्ये एकूण 1GB डेटा देण्यात आला आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 300 एसएमएस देखील मिळतात. तसेच या प्लॅनमध्ये 24 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. इतर बेनिफीट्समध्ये मोबाईल एडिशन फ्री ट्रायल, फ्री हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिक फ्री सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Vodafone Idea चा 129 रुपयांचा प्लॅन

या Vi प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 200 MB डेटा देण्यात आला आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले असून 18 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.

Reliance Jio चा 98 रुपयांचा प्लॅन

या Jio प्लानमध्ये दररोज 1.5 GB डेटा दिला जातो, त्यानुसार एकूण 21 GB हायस्पीड डेटा मिळेल. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट 64 Kbps च्या वेगाने चालते. त्यासोबत अमर्यादित व्हॉईस कॉलिंग या प्लॅनमध्ये अनलिमीटेड व्हॉइस कॉलिंग देण्यात आली आहे. वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता उपलब्ध असून इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चा अॅक्सेस दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: फ्री रेशन योजनेत ३ मोठे बदल! ८० कोटी रेशनधारकांवर थेट परिणाम होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

महत्त्वाचे अपडेट्स : IPL आता मार्च-मे मध्ये नव्हे, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार? दोन टप्प्यातही होऊ शकतं आयोजन; नेमकं कारण काय?

Konkan Railway: कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक जाहीर! मांडवी, तेजससह अनेक गाड्यांच्या वेळा बदलणार, काय परिणाम होणार?

“आरारारा खतरनाक…” ‘मुळशी पॅटर्न २’ लवकरच येणार, प्रवीण तरडे म्हणाले...

Latest Marathi News Live Update : उल्हासनगरात नालेसफाईचा फज्जा; काढलेली घाण पुन्हा नाल्यात

SCROLL FOR NEXT