China's Tiangong Space Station Captures Spectacular Spacewalk esakal
विज्ञान-तंत्र

Spacewalk Viral : ..अन् अंतराळवीर थेट पृथ्वीच्या वर लटकला; चीनच्या यानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल,बघितला काय?

Chinese Astronaut Spacewalk : तब्बल आठ तासांच्या स्पेस वाॅकचा रेकॉर्ड मोडला,आश्चर्यात टाकणारा व्हिडीओ झाला रेकॉर्ड

Saisimran Ghashi

Tiangong : चीनच्या अंतराळ संस्थेने (CMSA) नुकतेच काही अतभूत व्हिडिओ जारी केले आहे. या व्हिडिओमध्ये चिनी अंतराळवीर अंतराळात तिरंगी वर तरंगताना दिसत आहे. हे दृश्य तियांगोंग अंतराळ स्थानकाच्या रोबोटिक हॅन्डवर बसवलेल्या कॅमेऱ्याने कैद करण्यात आले आहे.

हे फक्त मनमोहक दृश्यच नाही तर अंतराळातील स्पेसवॉक कसा केला जातो याची झलकही दाखवते. या रोबोटिक हाताच्या मदतीने अंतराळवीर अवकाशात जाऊन विविध संशोधन करू शकतात. व्हिडिओमध्ये पृथ्वीचा गोलाकारपणा आणि जमीन व समुद्र यांचे विलोभनीय मिश्रण दिसत आहे.

हे अविश्वसनीय व्हिडिओ चीनच्या वाढत्या अंतराळ महत्वाकांक्षेचे प्रतीक आहे. तियांगोंग अंतराळ स्थानक हे अनेक मोठ्या शास्त्रीय यशांचे साक्षीदार आहे. येथे स्पेसवॉक आणि अत्याधुनिक वैज्ञानिक प्रयोग केले जातात.

अलीकडेच प्रक्षेपित झालेले शेनझोऊ-१८ हे अंतराळ मोहिम आधीच इतिहास रचले आहे. या मोहिमा दरम्यान झालेल्या 8.5 तासांच्या स्पेसवॉकने आत्तापर्यंतच्या कोणत्याही चिनी अंतराळ वाटचालीचा (EVA) विक्रम मोडीत काढला आहे.

तियांगोंगवर सहा महिन्यांच्या वास्तव्यात शेनझोऊ-१८ चा संघ विविध वैज्ञानिक प्रयत्नांमध्ये व्यस्त राहील. यामध्ये प्रयोग करणे, अंतराळ कचऱ्यापासून स्थानकाला वाचवण्यासाठी नवीन उपकरणे बसवणे आणि विज्ञान शिक्षणाचा प्रचार करणे यांचा समावेश आहे.

अंतराळातील स्वत:चे स्थान निर्माण करण्यामागची चीनची धडपड ही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक प्रकल्पात सहभागी होण्यापासून रोखले गेल्यानंतर आली. अमेरिकेच्या शंकांमुळे चीनला या प्रकल्पात सहभागी करता येत नव्हते. वर्षी चीनने अनेक मानवयुक्त आणि मालवाहू मोहिमांचे महत्वाकांक्षी नियोजनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT