Wifi Hacking Esakal
विज्ञान-तंत्र

Wi-Fi : तुमच्या घरातील वायफाय राउटर ठरतंय चिनी गुप्तहेर; सायबर हल्ल्यासाठी ड्रॅगनची नवीन पद्धत उघड

टीपी लिंक कंपनीचे वायफाय राउटर अशा प्रकारच्या हॅकिंगला सर्वाधिक बळी पडत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भारतात हेरगिरी करण्याचा चिनी ड्रॅगनचा आणखी एक डाव उघड झाला आहे. यापूर्वी मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून भारतीयांची माहिती चोरण्याचा प्रयत्न चीनने केला आहे. आता थेट घरातील वायफाय राउटरचा वापर करून चीन आपल्यावर लक्ष ठेवत असल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे तुमच्या घरात जर असं राउटर असेल तर वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.

कसं होतंय हॅकिंग?

मिळालेल्या माहितीनुसार, चिनी हॅकर्स राउटर्समध्ये धोकादायक फर्मवेअर इम्प्लांट करत आहेत. या मालवेअरमुळे राउटर पूर्णपणे हॅकर्सच्या ताब्यात जाते. त्यानंतर या राउटरला कनेक्ट असलेल्या डिव्हाईसमधील माहिती हॅकर्सना मिळू शकते. (Chinese hackers targeting Indian Wi-Fi routers)

टीपी लिंक सर्वात धोकादायक

चेक पॉईंट नावाच्या संस्थेने केलेल्या रिसर्चमधून या हॅकिंगबद्दल माहिती समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, की टीपी लिंक (Tp-Link) कंपनीचे वायफाय राउटर अशा प्रकारच्या हॅकिंगला सर्वाधिक बळी पडत आहेत. यासोबत अन्य कंपन्यांच्या राउटरनाही हॅकिंगचा धोका असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

अशा प्रकारच्या कारवाया करण्यासाठी चिनी हॅकर्सना सरकारचा पाठिंबा असल्याचा दावा चेक पॉईंटच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

अशी घ्या खबरदारी

अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांपासून बचावासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तुमच्या राउटरचे सॉफ्टवेअर हे वेळोवेळी अपडेट करत रहा. ज्यामुळे, तुमचा राउटर नवीन मालवेअर्सना रोखू शकेल. तसेच, नवीन राउटर घेतल्यानंतर त्याचे लॉग-इन क्रेडेंशिअल हे लवकरात लवकर बदलणे, आणि एक चांगला पासवर्ड वापरणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Traffic Rules : वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक नियम मोडल्यास आता कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; पोलिसांचा मोठा निर्णय

विराट कोहलीसारखं 'Fit' दिसण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा मेहनत सोडून शॉर्टकट? वजन कमी करण्यासाठी घेतायेत इंजेक्शन?

Marathi News Live Updates: विरोधकांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब

Trekking Missing Case : ‘ट्रेकिंगला जातोय’ म्हणून होणाऱ्या पत्नीला मेसेज; IIT इंजिनिअर ५ दिवसांपासून बेपत्ता, लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांची झोप उडाली

Kolhapur News: आई मला निदान तोंडाने तरी शेवटचा श्वास दे गं, तरुण मुलाचा मृत्यू; उपचारात हलगर्जीपणाचा आरोप, दवाखाना सील

SCROLL FOR NEXT