Mobile Games Esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Games : १३ वर्षांच्या मुलीने गेमिंगवर उडवले ५२ लाख; आईच्या खात्यात उरले केवळ ५ रुपये

शाळेमध्ये असतानाही ही मुलगी कायम मोबाईल गेम्स खेळत असायची.

Sudesh

गेमिंगचं खूळ एकदा डोक्यात शिरलं, की त्याचं व्यसन होण्यास वेळ लागत नाही. यातून मग कित्येक लोकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं. चीनमधील एका महिलेला असाच अनुभव आला. या महिलेच्या १३ वर्षीय मुलीला मोबाईल गेमिंगंच वेड होतं. यातून तिने आपल्या आईच्या अकाउंटमधून तब्बल ५२ लाख रुपये उडवले.

शाळेमध्येही खेळायची गेम्स

शाळेमध्ये असतानाही ही मुलगी कायम मोबाईल गेम्स खेळत असायची. यामुळे तिच्या शिक्षकांनी मुलीच्या आईशी संपर्क साधला. यानंतर मुलीच्या आईने आपल्या बँक खात्यातील रक्कम तपासली, आणि हा प्रकार समोर आला.

चीनमधील सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला आपल्या बँक स्टेटमेंटच्या प्रिंट्स दाखवत रडताना दिसत आहे.

खात्यात उरले ५ रुपये

या मुलीच्या आईने जेव्हा आपलं बँक खातं तपासलं, तेव्हा त्यात केवळ ०.५ युआन (सुमारे ५ रुपये) एवढीच रक्कम शिल्लक असल्याचं दिसून आलं. यानंतर तिने बँक स्टेटमेंट चेक केले. यामध्ये मोबाईल गेमच्या पेमेंटसाठी झालेले कित्येक ट्रान्झॅक्शन दिसून आले.

या मुलीने मोबाईल गेम्स खरेदी करण्यासाठी सुमारे १४ लाख रुपये खर्च केले होते. तर, गेम्समधील फीचर्स खरेदी करण्यासाठी सुमारे २४ लाख रुपये खर्च केले होते. यासोबतच तिने आपल्या वर्गातील मैत्रिणींसाठी देखील गेम्स खरेदी केल्या होत्या. यासाठी तिने सुमारे १२ लाख रुपये खर्च केले होते, असंही दिसून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT