Fly91 
विज्ञान-तंत्र

New Airline: आणखी एक विमान कंपनी भारतीयांच्या सेवेत दाखल; काय आहे नाव? जाणून घ्या

२ मार्चला गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बेंगळुरु विमानतळाकडे FLY91 ने उड्डण केले होते. कंपनीने ‘IC’ हा कोड वापरण्याचे ठरवले आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने Directorate General of Civil Aviation (DGCA) नव्या विमान कंपनीला बुधवारी परवानगी दिली आहे. त्यामुळे यापुढे Fly91 विमान प्रवाशांना सेवा देताना पाहायला मिळणार आहे. (DGCA on Wednesday granted the Air Operator's Certificate (AOC) to new airline Fly91)

erstwhile Kingfisher चे सहसंस्थापक मनोज चोका यांच्या मालकीची ही कंपनी आहे. 'जस्ट उडो ऐव्हिएशन Pvt Ltd' कंपनीला विमान वाहतूक मंत्रालयाने विमान वाहतूक सुरु करण्याची परवानगी मागील वर्षी एप्रिल महिन्यात दिली होती. FLY91 या नावाने ही विमानसेवा असणार आहे.

२ मार्चला गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बेंगळुरु विमानतळाकडे FLY91 ने उड्डण केले होते. कंपनीने ‘IC’ हा कोड वापरण्याचे ठरवले आहे. इंडियन एअरलाईन्सने एअर इंडियामध्ये विलीन होण्याआधी १९५३ ते २०११ मध्ये हाच कोड वापरला होता. व्यावसायिक उड्डाणासाठी एअर ऑपरेटर सर्टिफिकेट अनिवार्य असते. कंपनीला ते मिळाले असल्याने प्रवाशी वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी विमान कंपनी ही मूळची गोव्यातील आहे. Fly91 च्या पहिल्या फ्लाईटने ATR 72-600 मोपा विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर वॉटर कॅनानची सलामी देण्यात आली. कंपनीने AOC मधील सर्व टेस्ट पूर्ण केल्या आहेत. कंपनी विशेषत: देशातील टायर-१ आणि टायर-२ शहरांना प्राधान्य देणार आहे. आवश्यकतेनुसार ऑपरेशन वाढवले जाणार आहे.

सरकारच्या उडाण योजनेंतर्गत कंपनीला काही मार्च निश्चित करण्यात आले आहेत. डीजीसीएने यासंदर्भातील माहिती दिली आहे. उडाण अंतर्गत महाराष्ट्रतील सिंधुदुर्ग, जळगाव, नांदेड आणि लक्षद्वीपमधील अगत्तीला ही शहरे जोडली जाणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT