Function Keys Function Keys
विज्ञान-तंत्र

की-बोर्डवरील Function Keys कोणत्या अन् कसा होतो वापर, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

कॉम्प्यूटर आणि लॅपटॉप काय आहे, हे आज कोणालाही सांगायची गरज नाही. याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. शासकीय कार्यालय असो किंवा खासगी कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपवर सर्व कामे केली जातात. कॉम्प्यूटरने जीवन अगदी सोपे झाले आहे. तसेच कमी वेळात अधिक काम होत असल्याने जास्त काम निघते.

कमी वेळात अधिक काम व्हावे यासाठी की-बोर्डवर अनेक शॉर्टकट की दिलेल्या आहेत. मात्र, त्याचा योग्य वापर कसा करावा याची माहिती अनेकांना नाही. कॉम्प्यूटर काम करताना अनेक गोष्टींचा अनेकदा वापर केला जातो. यात मॅटर कॉपी किंवा कट करणे आदींचा समावेश असतो. यासाठी की-बोर्डवर शॉर्टकट बटण दिलेल्या आहेत. तसेच फंक्शन की दिलेल्या आहे. याचा वापर कसा करावा हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

तुम्ही कोणताही कॉम्प्यूटर घ्या किंवा लॅपटॉप घ्या. एक गोष्ट मात्र सारखी पाहायला मिळते. ती म्हणजे की-बोर्ड. की-बोर्ड लहान-मोठा असला तरी त्यावरील फंक्शन की मात्र सारख्याच असतात. त्यात कोणत्याच प्रकारचा बदल नसतो. तुम्ही बघितले असेल की-बोर्डवर F1 ते F12 अशी १२ बटणे असतात. यालाच Functional Keys म्हणतात. याचा कोणत्या कामासाठी आणि कसा वापर होतो हे पाहुया...

F1 या बटणाचा वापर हेल्प की म्हणून केला जातो. कम्प्युटर सुरू करतो तेव्हा ही की दाबल्यावर थेट कॉम्प्यूटरच्या सेटअपमध्ये जातो. याद्वारे सेटिंग्ज तपासू शकता तसेच सेटिंग्समध्ये बदल करू शकता.

F2 या की चा वापर फाईलचे नाव बदलण्यासाठी होतो.

F3 विंडोजमध्ये या की चा वापर करून सर्च बॉक्स उघडू शकतो. याद्वारे फाईल अथवा फोल्डर सर्च करू शकतो. या व्यतिरिक्त MS-DOS मध्ये ही की प्रेस केल्याने आधी दिलेली कमांड परत टाइप होते.

F4 माइक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करताना ही की प्रेस केल्याने आधी केलेले काम रिपीट होते.

F5 या की चा वापर मुख्य करून कॉम्प्यूटर रिफ्रेश करण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त या की ला पावरपॉईंटमध्ये प्रेस केल्यास स्लाइड शो सुरू होतो.

F6 ही की प्रेस केल्याने विंडोजमध्ये ओपन असलेल्या फोल्डर्सचे कन्टेन्ट दिसतात. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ओपन असलेले वेगवेगळे डॉक्युमेंट्स एक-एक करून बघण्यासाठी Control+Shift+F6 चा उपयोग केला जातो.

F7 मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये या की ला प्रेस केल्यावर आपण जे काही लिहितो त्याचे स्पेलिंग तसेच व्याकरण तपासले जाते. Shift+F7 प्रेस केल्याने हायलायटेड केलेल्या शब्दाची शब्दकोश तपासणी केली जाते.

F8 मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेक्स्टला सिलेक्ट करण्यासाठी या की चा उपयोग केला जातो.

F9 मायक्रोसॉफ्ट आउटलूकमध्ये ई-मेल सेंड किंवा रिसिव्ह करण्यासाठी या की चा वापर होतो. तर काही लॅपटॉप्समध्ये या की चा उपयोग करून स्क्रीनची ब्राईटनेस कमी करता येते. तसेच मायक्रोसॉफ्ट वर्डमधील डॉक्युमेंट्स रिफ्रेश करण्यासाठीही या की चा वापर होतो.

F10 कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये काम करताना या की ला प्रेस केल्याने मेन्यू ओपन होतो. तसेच Shift+F10 प्रेस केल्याने हे माउसच्या राइट क्लिकचे काम करते. तर काही लॅपटॉप्समध्ये या की चा उपयोग करून स्क्रीनची ब्राईटनेस वाढवता येते.

F11 इंटरनेट ब्राउजर्समध्ये फूल स्क्रीन व्ह्यू करण्यासाठी या की चा उपयोग केला जातो.

F12 मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ही की प्रेस केल्याने Savs As चे ऑप्शन ओपन होते. तसेच Shift+F12 प्रेस केल्याने मायक्रोसॉफ्ट फाईल सेव्ह होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT