confirm Confirm Tatkal railway Ticket booking tips ganpati festival 2024 confirm railway ticket booking tips ganpati festival 2024
विज्ञान-तंत्र

Confirm Tatkal Ticket : गणपतीला घरी जायचंय पण तिकीट कन्फर्म होत नाही? तत्काळ रेल्वे तिकीटांसाठी मिळाली सगळ्यात भारी ट्रिक

Railway Confirm Ticket Booking Tips : गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच जास्त असते. यामुळे तिकिटांची मागणी वाढते आणि उपलब्धता कमी होते. अश्या वेळेस रेल्वेचे कन्फर्म तिकीट बूक करायची सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

Saisimran Ghashi

Confirm Train Ticket Booking Tips : गणपती बाप्पा येणार म्हणल्यावर आपण आपल्या गावी किंवा नातेवाईकांना भेटायला जायचं ठरवलं. पण रेल्वे किंवा बसचं तिकीट मिळणे कठीण जात आहे. अशा वेळी खूप अडचण होते.

गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच जास्त असते. यामुळे तिकिटांची मागणी वाढते आणि उपलब्धता कमी होते.तत्काळ तिकिटे मिळवण्यासाठी लोकांमध्ये खूप चढाओढ असते. रेल्वेचे पद्धती काहीवेळा अडचणी निर्माण करतात. अश्या अनेक कारणांच्यामुळे तिकीट मिळण्यास विलंब होतो किंवा कन्फर्म तिकीट मिळत नाही. तर तिकीट कन्फर्म करण्याची सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अनेकदा आपल्याला अचानक कुठे तरी जायचे असते आणि तिकिटे उपलब्ध नसतात. अशा वेळी IRCTC चे तत्काळ तिकीट आपल्याला मदत करू शकते. पण तत्काळ तिकीट कसे बुक करायच हे याची सोपी ट्रिक आहे तत्काळ तिकीट.

तत्काळ तिकीट काय आहे?

IRCTC वरून तुम्ही शेवटच्या क्षणी ट्रेनचे तिकीट बुक करू शकता, यालाच तत्काळ तिकीट म्हणतात. ही एक खास सुविधा आहे ज्यामुळे तुम्ही आपल्या प्रवासासाठी अचानक तिकीट बुक करू शकता.

तत्काळ तिकीट बुक करण्याची पद्धत

IRCTC खाते तयार करा

सर्वप्रथम, तुम्हाला IRCTC वेबसाइटवर एक खाते तयार करावे लागेल.

तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा.

नंतर वापरकर्ता नाव आणि पासवर्ड तयार करून लॉगिन करा.

प्रवास निवडा

लॉग इन झाल्यानंतर, 'प्लॅन माय जर्नी' या पर्यायावर जा.

तुमचे स्टेशन, तारीख आणि वर्ग निवडा.

नंतर 'तत्काळ' पर्याय निवडा.

तत्काळ तिकिट उपलब्धता तपासा

तत्काळ तिकिटे मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात.

एसी क्लासेससाठी सकाळी 10 वाजता आणि नॉन-एसी क्लासेससाठी सकाळी 11 वाजता बुकिंग सुरू होते.

प्रवासी तपशील भरा

तुमचे नाव, वय आणि आयडी पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड) भरा.

पेमेंट करा

क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी पद्धतीने पेमेंट करा.

तिकीट डाउनलोड करा

पेमेंट झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर एक मेसेज आणि ईमेल मिळेल.

यात तुमचे तिकीट आणि पीएनआर नंबर असेल.

तुम्ही हे ई-तिकीट डाउनलोड करू शकता किंवा प्रिंटही काढू शकता.

तत्काळ तिकीट बुक करताना काय काळजी घ्यावी?

  • तत्काळ तिकिटे लवकर विकली जातात, म्हणून वेगवान इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.

  • तुमचे खाते तपशील, प्रवासाची माहिती आणि पेमेंटची माहिती तयार ठेवा जेणेकरून बुकिंग वेळी वेळ वाया जाणार नाही.

  • जर तुम्हाला पहिल्या प्रयत्नात तिकीट मिळाले नाही तर निराश होऊ नका. काही वेळा पुन्हा प्रयत्न करा.

  • जर तुम्हाला स्वतःहून बुकिंग करण्यात अडचण येत असेल तर तुम्ही बुकिंग एजंटची मदत घेऊ शकता.

आपल्या मोबाइलमध्ये IRCTC ॲप डाउनलोड करा: यामुळे तुम्ही कुठूनही, कोणत्याही वेळी तिकीट बुक करू शकता.

अधिकृत वेबसाइटचाच वापर करा: फसवणूकीपासून वाचण्यासाठी फक्त IRCTC ची अधिकृत वेबसाइट वापरा.

तत्काळ तिकिटांची उपलब्धता बद्दल माहिती ठेवा: कोणत्या ट्रेनमध्ये किती तिकिटे उपलब्ध आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही IRCTC वेबसाइटवर तपासू शकता.

आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. तुम्हाला गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट मिळवण्यात यश येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT