Aditya L1 Launch eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Launch : 'भारत माता की जय...', आदित्य एल-1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर लोकांचा जल्लोष; व्हिडिओ व्हायरल

ISRO Solar Mission : आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम आहे.

Sudesh

काही दिवसांपूर्वी चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, आज इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. भारताची पहिली सौर मोहीम असलेल्या 'आदित्य एल-1'चे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सतीश धवन स्पेस सेंटरवर जमलेल्या लोकांनी 'भारत माता की जय' अशा घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला.

आज सकाळी 11:50 वाजता आदित्य उपग्रहाचे पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवर असणाऱ्या दुसऱ्या लाँचिंग पॅडवरुन PSLV अवकाशात झेपावलं. हा सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी स्पेस सेंटरजवळ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

अविस्मरणीय क्षण

या यानाचं प्रक्षेपण झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला. त्यांनी आनंदाने 'भारत माता की जय..' अशा घोषणाही दिल्या. हा एक अविस्मरणीय क्षण असल्याचं मत तिथे उपस्थित लोकांनी व्यक्त केलं. काही जण तर केवळ या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईवरुन श्रीहरीकोटा येथे गेले होते.

काय आहे मोहीम?

आदित्य एल-1 ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आखण्यात आलेली मोहीम आहे. यामध्ये आदित्य हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या L1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येणार आहे. सुमारे चार महिने प्रवास करून 'आदित्य' याठिकाणी पोहोचणार आहे.

आज 11:50 वाजता लाँच केल्यानंतर सुमारे एका तासाने आदित्य उपग्रह पीएसएलव्ही रॉकेटपासून वेगळा झाला. यानंतर हे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचं इस्रोने जाहीर केलं. आता 18 सप्टेंबरपर्यंत हा उपग्रह पृथ्वीच्याच कक्षेत असणार आहे. त्यानंतर हा पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि L1 च्या दिशेने आपला प्रवास सुरू करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Latest Marathi News Live Update : बार्शीत जुन्या वादातून गोळीबार; एक युवक गंभीर जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

Toll Plaza Pass : अवघ्या ३४० रुपयांत मिळतोय टोल पास, करता येतो अमर्यादित प्रवास, 'या' वाहनधारकांना फायदा

SCROLL FOR NEXT