Clouds on Mars 
विज्ञान-तंत्र

क्‍युरियॉसिटी रोव्हरने टिपली मंगळावरील ढगांची छायाचित्रे

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) मंगळ मोहिमेचा भाग असलेल्या क्‍युरियॉसिटी बग्गीने मंगळावरील ढगांची छायाचित्रे पाठविली आहेत.

मंगळावरील "माउंट शार्प' या डोंगराळ भागातील "गेल क्रेटर'च्या (दरी) तळाच्या भागाचा सध्या ही बग्गी अभ्यास करते आहे. "क्‍युरियॉसिटी'च्या माध्यमातून या ठिकाणी मंगळाच्या पृष्ठभागावर उत्खनन केले जात आहे. या वेळी बग्गीच्या वर बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांनी मंगळावरील ढगांची कृष्णधवल छायाचित्रे टिपली असून, ती नुकतीच "नासा'कडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 

7 ते 17 मे या कालावधीत ही छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. या छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या ढगांमध्ये बर्फाच्या रूपात पाणी असल्याचे "नासा'ने म्हटले आहे. मंगळाच्या पृष्ठभागापासून सुमारे 31 किलोमीटर उंचीवर असलेल्या या ढगांचे पृथ्वीवरील ढगांशी मोठ्या प्रमाणात साधर्म्य आहे. दुसऱ्या ग्रहावरूनही मंगळावरील हे ढग दिसू शकतात, असे "नासा'ने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saptashrungi Devi Templ: सप्तशृंगी गडावर अन्न प्रशासनाचा छापा; ५.६२ लाखांची १,४०८ किलो मिठाई नष्ट, दर्शनाला जाणाऱ्यांनो सावधान..

Abhishek Sharma: विंडीजचे डावपेच हाणून पाडले;अभिषेक शर्मा;टी-२०तील आक्रमक फलंदाजीचे विश्लेषण

Rahul Gandhi: काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयातच फजिती? राहुल गांधींच्या SIR याचिकेत १४ त्रुटी, २२० रुपयेही कमी; सुनावणीच रखडली!

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, पाऊस परतणार?; कोकणात पावसाचा अंदाज

Solapur Road Accident: बहिणीला भेटून गावाकडे परतत होते; अज्ञात वाहनाची धडक, ४८ वर्षीय भावाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT