Former Staff Asked to Repay Overpayment by Elon Musk's X esakal
विज्ञान-तंत्र

X Overpayment Issue : इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांचा पगार मागितला परत; कोट्यवधींच्या रक्कमेसाठी काढली नोटीस,जाणून घ्या काय आहे प्रकरण

Elon Musk Overpayment : माजी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधींची रक्कम परत मागण्यात आली, पाठवण्यात आली कायदेशीर नोटीस

Saisimran Ghashi

Elon Musk : इलॉन मस्क यांच्या मालकीची सोशल मीडिया कंपनी X, ज्याला आधी ट्विटर म्हणून ओळखले जायचे, आता त्यांनी माजी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधींची रक्कम परत मागवली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील माजी कर्मचाऱ्यांना कंपनीने दिलेल्या सेवानिवृत्ती रक्कम देताना अमेरिकन डॉलर ते ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये चलन रूपांतरण करताना झालेली चूक कंपनीने मान्य केली आहे.

या चुकीमुळे काही कर्मचाऱ्यांना जास्त रक्कम दिली गेली असून त्या रकमेची परतफेड करण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे. वृत्तानुसार, ही रक्कम $1,500 ते तब्ब्ल $70,000 इतकी असू शकते. किमान सहा जणांना या प्रकरणी कायदेशीर नोटिसा कंपनीकडून पाठवल्या गेल्या आहेत.

" जानेवारी 2023 मध्ये आपल्याला चुकून मोठी रक्कम जास्त देण्यात आली आहे, याची आम्हाला कल्पना आली आहे.", असे मजकूर X कंपनीच्या आशिया पॅसिफिक HR विभागाने केलेल्या ईमेलमध्ये असल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे. "शक्य तितक्या लवकर ही रक्कम परत करण्याची आम्ही विनंती करतो." असेही त्या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या रकमेचे कारण म्हणजे कर्मचारी कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांना दिलेले कंपनीच्या शेअर्सशी संबंधित "डिफर्ड कॅश कंपन्सेशन" असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. इलॉन मस्क यांच्या कंपनीवर अनेक कर्मचाऱ्यांना वेतन न देणे, कामाच्या ठिकाणी अत्याचार करणे अशा आरोपांचा वर्षभरापूर्वी सामना झाला होता.

2022 मध्ये 44 बिलियन अमेरिकन डॉलरमध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली होती, त्यावेळी त्यांना देय असलेले वेतनही दिले गेले नाही असे आरोपही झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT