Cyber Attack esakal
विज्ञान-तंत्र

Cyber Attack : Microsoft युजर्स आहेत हॅकर्सच्या निशान्यावर, सरकारी एजन्सीने दिला धोक्याचा इशारा, लगेचच करा हे काम,तरच...

CERT-In एजन्सी त्रुटींबाबत युजर्सना अपडेट्स देत असते

सकाळ डिजिटल टीम

Cyber Attack :

CERT-In या सरकारी एजन्सीने मायक्रोसॉफ्ट युजर्ससाठी धोक्याचा इशारा दिला आहे. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने Windows 10, Windows 11 आणि Microsoft Office वापरकर्त्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.  

देशाची सायबर सुरक्षेची काळजी घेणाऱ्या या एजन्सीला या Microsoft प्रोडक्टमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार सामान्य वापरकर्त्यांना लक्ष्य करू शकतात.

CERT-In एजन्सी त्रुटींबाबत युजर्सना अपडेट्स देत असते. एजन्सीने हा दोष धोकादायक लेबलसह प्रकाशित केला आहे. त्यात असे म्हटले आहे की, 'मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. ज्याचा फायदा घेऊन हॅकर्स Uncontrolled कोड ऍक्टीव्ह करू शकतात. तसेच,सेफ्टी फिचर्स बायपास केली जाऊ शकतात आणि टाग्रेटच्या सिस्टीममध्ये तडजोड केली जाऊ शकते.

एजन्सीच्या मते, या वल्नेरेबिलिटीज चुकीच्या रिस्ट्रिक्शन एक्सेसमुळे आहेत. या त्रुटी प्रॉक्सी ड्रायव्हर्स आणि मार्क ऑफ वेबमध्ये आहेत. एजन्सीने म्हटले आहे की Smart screen safety feature मार्क ऑफ वेब फिचरला बायपास करते आणि मालवेअरला टार्गेट प्रणालीमध्ये प्रवेश करण्यास सांगते.

कोणते युजर्स होतील टार्गेट ?

या त्रुटींमुळे Microsoft Windows, Microsoft Office, Developers Tools, Azure, Browser, System Center, Microsoft Dynamics आणि Exchange Server वर थेट परिणाम होऊ शकतो. हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊ शकतात आणि खास तयार केलेल्या Request पाठवून सिस्टमला टार्गेट करू शकतात.

एजन्सीने सर्व वापरकर्त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी शक्य तितक्या लवकर सेफ्टी फिचर्स अपडेट करावेत. यापूर्वी, CERT-In ने Windows 10 आणि Windows 11 वापरकर्त्यांसाठी एक इशारा दिला होता. एजन्सीने सांगितले होते की मायक्रोसॉफ्ट विंडोज कर्नलमध्ये असलेल्या त्रुटीचा फायदा घेऊन हॅकर्स सिस्टमला टार्गेट करू शकतात.

मात्र, या त्रुटीबाबत एजन्सीने फारशी माहिती दिली नाही. हा धोका 32-बिट्स आणि 64-बिट्स आधारित प्रणालींसाठी दिसून आली. हा उच्च जोखमीचा इशारा होता, जो वर्षाच्या सुरुवातीला देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT