Cyber Crime Similar Email eSakal
विज्ञान-तंत्र

Cyber Crime : ई-मेल आयडीमध्ये केवळ एक गोष्ट बदलून WHO अधिकाऱ्याला गंडा; लाखो रुपयांची फसवणूक

Cyber Fraud : सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धतींनी लोकांची फसवणूक करत आहेत.

Sudesh

तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याच वेगाने सायबर गुन्हेगार फसवणुकीचे नवनवीन प्रकार शोधत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका निवृत्त अधिकाऱ्याचीही एका नवीन प्रकारे फसवणूक करण्यात आली. ७८ वर्षांच्या या व्यक्तीला गुन्हेगारांनी तब्बल 3.56 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

ई-मेल आयडीमध्ये केला बदल

या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्याला आपल्या मित्राचा एक ई-मेल आला होता. या ई-मेलमध्ये त्यांच्या मित्राने पैशांची मदत मागितली होती. मात्र, नंतर हा खोटा ई-मेल आयडी असल्याचं लक्षात आलं. मात्र, तोपर्यंत या व्यक्तीने पैसे पाठवले होते.

एका 'S' मुळे झाली फसवणूक

या निवृत्त अधिकाऱ्याला johnpmeneze@gmail.com या ई-मेल आयडीवरुन मेल आला होता. मात्र, त्यांच्या मित्राचा ईमेल आयडी johnpmenezes@gmail.com असा आहे. पहिल्या ई-मेल आयडीमध्ये 'S' नसल्याचं या व्यक्तीच्या लक्षात आलं नाही, त्यामुळे त्यांची फसवणूक झाली.

मित्र बनून मागितली मदत

ई-मेल करणाऱ्या व्यक्तीने या अधिकाऱ्याशी त्यांचा मित्र बनून गप्पा मारल्या. आपल्या घरात नवीन पाहुणा आल्याचं या व्यक्तीने सांगितलं, तेव्हा अधिकाऱ्याने त्याचं अभिनंदन केलं. यानंतर दुसऱ्या एका मेलमध्ये या व्यक्तीने आपली लंडन ते भारत फ्लाईट मिस झाल्याचं सांगितलं. आपल्या पत्नीची तब्येत बिघडली असून, नवीन फ्लाईट बुक करण्यासाठी आपल्याला पैसे हवे असल्याचं या मेलमध्ये म्हटलं होतं.

निवृत्त अधिकाऱ्याने मैत्रीखातर या व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर पैसे पाठवले. अशाच प्रकारे २६ जुलै ते ३१ जुलै दरम्यान विविध कारणांनी या अधिकाऱ्याकडून ३.५६ लाख रुपये घेण्यात आले. मात्र, नंतर आपली फसवणूक झाल्याचं या निवृत्त अधिकाऱ्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT