AI for Earning eSakal
विज्ञान-तंत्र

AI for Earning : क्रिप्टोमध्ये गमावली आयुष्यभराची कमाई; एआयच्या मदतीने पुन्हा कमावले एक कोटी रुपये!

AI Money Earning : एआय लोकांच्या नोकऱ्या खाणार हे कित्येक जण सांगताना दिसतात.

Sudesh

सध्या सगळीकडे एआय आणि क्रिप्टोकरन्सीच्या चर्चा सुरू आहे. एआय लोकांच्या नोकऱ्या खाणार हे कित्येक जण सांगताना दिसतात. मात्र, याच एआयने एका तरुणाचं आयुष्य बदलून टाकलंय. सायप्रस देशातील तरुणाने एआयच्या मदतीने तब्बल एक कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत.

32 वर्षांच्या ओले लेहमॅन नावाच्या तरुणाची ही गोष्ट आहे. हा तरुण क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करुन कमाई करत होता. गेल्या सहा वर्षांपासून या माध्यमातून तो उदरनिर्वाह करत होता. मात्र, 11 नोव्हेंबर 2022 रोजी, एफटीएक्स क्रॅश झालं. यामुळे या तरुणाने जवळपास आपली आयुष्यभराची कमाई क्रिप्टोमद्ये गमावली.

यानंतर काही दिवसांनी लेहमॅनल चॅटजीपीटीबद्दल माहिती मिळाली. याबाबत थोडाफार अभ्यास केल्यानंतर, जानेवारी 2023 मध्ये लेहमॅनने एक एक्स (ट्विटर) अकाउंट सुरू केलं. या अकाउंटवरुन तो एआयबाबत टिप्स आणि माहिती पोस्ट करत होता.

पुढे एप्रिलमध्ये त्याने 'दि एआय सोलोप्रन्योर' नावाने आणखी एक एक्स अकाउंट सुरू केलं. या अकाउंटच्या माध्यमातून त्याने सोलो उद्योजकांना आपलं प्रॉडक्शन वाढवण्यासाठी एआयचा वापर कसा करता येईल याबाबत टिप्स देण्यास सुरुवात केली. लोकांना याचा फायदा होऊ लागला.

लाँच केला कोर्स

या टिप्स लोकांना भरपूर आवडू लागल्या. यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये या एक्स अकाउंटला 1 लाखांहून अधिक फॉलोवर्स मिळाले. यानंतर लेहमॅनने 'एआय ऑडियन्स एक्सेलेरेटर' नावाचा एक कोर्स लाँच केला. हा नवीन आणि लहान उद्योजकांच्या मदतीसाठी कोर्स होता.

179 डॉलर एवढ्या किंमतीचा हा कोर्स होता. अवघ्या एका महिन्याच्या काळात तब्बल 1,078 लोकांनी हा कोर्स विकत घेतला. यामुळे एका महिन्यातच या तरुणाची एक कोटींहून अधिक कमाई झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT