Disney+Hotstar Account Sharing eSakal
विज्ञान-तंत्र

Disney+Hotstar : डिज्नी+हॉटस्टारचं नेटफ्लिक्सच्या पावलावर पाऊल? आता याचंही अकाउंट करता येणार नाही शेअर!

Hotstar : हॉटस्टारचे भारतात ५० दशलक्षांहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत.

Sudesh

नेटफ्लिक्सने काही दिवसांपूर्वीच भारतात अकाउंट शेअरिंग पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता डिस्नी+हॉटस्टार देखील अशाच प्रकारचा निर्णय घेणार असल्याचं समोर आलं आहे. एका रिपोर्टनुसार, Disney+Hotstar च्या प्रीमियमसाठी हा नियम लागू होईल.

इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यानुसार, प्रीमियम यूजर्सना पासवर्ड शेअर करता येऊ नये यासाठी डिज्नी+हॉटस्टार पावलं उचलत आहे. हा नियम लागू झाल्यानंतर प्रीमियम यूजर्स हे केवळ एकाच डिव्हाईसवरुन लॉग-इन करू शकतील. सबस्क्राईबर वाढवण्याच्या दृष्टीने याबाबत विचार सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.

नेटफ्लिक्सचा आधीच दणका

नेटफ्लिक्सने अशा प्रकारची पॉलिसी यावर्षी मे महिन्यातच लागू केली होती. यावेळी अमेरिकेसह 100हून अधिक देशांमध्ये पासवर्ड शेअरिंग बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर या महिन्यात भारतासह अन्य काही देशांचाही यात समावेश करण्यात आला. यामुळे नेटफ्लिक्स यूजर्स आता केवळ आपल्या घरातल्या व्यक्तींसोबत आपलं अकाउंट शेअर करू शकतात. (Tech News)

डिज्नी+हॉटस्टार

सध्या भारतात डिज्नी+हॉटस्टारचे प्रीमियम यूजर्स १० डिव्हाईसेसवर लॉग-इन करू शकतात. म्हणजेच एका प्रीमियम अकाउंटवरुन दहा व्यक्ती कंटेंट पाहू शकतात. ही संख्या कमीत कमी चार डिव्हाईसेस किंवा एका यूजरसाठी एकच डिव्हाईस एवढी कमी करण्याचा कंपनीचा विचार आहे. कंपनी सुरुवातीला याची चाचणी घेईल, आणि त्यानुसार अंमलबजावणी होणार आहे.

हॉटस्टारचे भारतात ५० दशलक्षांहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत. ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने कंपनी प्रयत्न करत आहे. दुसऱ्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी केवळ प्रीमियमच नाही तर इतर प्लॅन्स असलेल्या यूजर्सवरही बंधनं लागू करू शकते. यानुसार, स्वस्त प्लॅन्स असणारे यूजर्स कदाचित केवळ दोन डिव्हाईसवर लॉग-इन करू शकतील. कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT