Mobile Tips Cracked Screen Smartphone eSakal
विज्ञान-तंत्र

Mobile Tips : तुटलेल्या स्क्रीनचा स्मार्टफोन वापरणं ठरू शकतं घातक! आजच बदलून घ्या मोबाईलचा डिस्प्ले

Cracked Screen Smartphone : असा फोन वापरणं स्मार्टफोनसाठी आणि तुमच्याही आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

Sudesh

कितीही चांगला स्मार्टफोन असला, तरीही तो खाली पडल्यानंतर डिस्प्लेला तडे जातातच. कित्येक लोक असेच क्रॅक असलेले किंवा तुटक्या डिस्प्लेचे स्मार्टफोन वापरत असतात. सध्या काम चालवू, आणि नंतर आणखी खराब झाल्यावर एकदमच बदलू असा विचार हे लोक करतात.

तुम्हीदेखील असाच विचार करुन तुटलेल्या स्क्रीनचा फोन वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. असं करणं तुमच्या स्मार्टफोनसाठी आणि तुमच्याही आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. यामुळे तुटलेला डिस्प्ले लवकरात लवकर बदलून घेणंच तुमच्या फायद्याचं ठरतं.

टच रिस्पॉन्स

स्मार्टफोनचा डिस्प्ले क्रॅक झाल्यानंतर त्यावर काम करणं अवघड जातं. आजचे स्मार्टफोन हे संपूर्णपणे स्क्रीन-टच असतात, त्यामुळे स्क्रीनच ठीक नसेल तर स्मार्टफोन वापरणंच शक्य होत नाही. तसंच खराब डिस्प्ले तसाच वापरत राहिल्यास तो आणखी खराब होण्याची शक्यता असते. याचा मोबाईलच्या टचपॅडवरही परिणाम होतो.

फोनमध्ये जाऊ शकते धूळ

तुटलेल्या स्क्रीनचा फोन वापरण्याचा एक मोठा धोका म्हणजे मोबाईलमध्ये धूळ जाणं. स्क्रीनच्या तुटलेल्या भागातून धुळीचे अगदी छोटे कण फोनच्या आत जाऊ शकतात. डोळ्यांना न दिसणाऱ्या या कणांमुळे मोबाईलचं मोठं नुकसान होऊ शकतं.

डोळ्यांना धोका

आपल्या स्मार्टफोनमधून निघणारी 'ब्लू-लाईट' ही आपल्या डोळ्यांसाठी अगदी घातक असते. फोनवर असणारा डिस्प्ले या लाईटचा धोका कमी करण्याचं काम करतो. यासाठी त्यावर एक प्रोटेक्शन लेअर दिलेली असते. मात्र, डिस्प्ले तुटल्यामुळे ही लाईट थेट तुमच्या डोळ्यात जाऊ शकते, ज्याचा विपरित परिणाम तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT