दिवाळीच्या निमित्ताने सर्व ई-कॉमर्स साईटवर मोठे सेल सुरू होते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स पहायला मिळाल्या. हे सेल आता संपले आहेत. कित्येक लोक अजूनही ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन शॉपिंगलाच प्राधान्य देतात. यामुळेच कित्येक दुकानांमध्ये देखील ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत.
विजय सेल्स ही देशातील मोठी इलेक्ट्रॉनिक्स शॉप्सची चेन आहे. याठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने कित्येक ऑफर्स उपलब्ध आहेत. तसेच नो कॉस्ट ईएमआय, कार्ड ऑफर्स आणि इतर पर्यायही उपलब्ध आहेत.
विजय सेल्समध्ये HDFC, ICICI, HSBC, YES, Federal, RBL, IDFC अशा कित्येक बँकांच्या कार्डवर 7,500 रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंट ऑफर्स मिळत आहेत. मोबाईल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, होम आणि किचन अप्लायन्सेसवर या ऑफर्स लागू आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी बड्स 2 हे याठिकाणी केवळ 5,799 रुपयांना उपलब्ध आहेत. तर रेडमी, रिअलमी, व्हिवो, सॅमसंग अशा कंपन्यांचे स्मार्टफोन 15 हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. आयफोन आणि आयपॅडवर देखील याठिकाणी बंपर डिस्काउंट मिळत आहे.
याठिकाणी 8,999 रुपयांपासून वॉशिंग मशीन मिळत आहे. 1,999 रुपयांपासून व्हॅक्यूम क्लीनर्स उपलब्ध आहेत. फिलिप्सचा एअर फ्रायर केवळ 6,499 रुपयांना मिळतो आहे. यावर ईएमआय ऑप्शनही उपलब्ध आहे.
विजय सेल्समध्ये टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप, गेमिंग कन्सोल, वॉशिंग मशीन अशा प्रॉडक्ट्सवर देखील मोठा डिस्काउंट मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.