Alaska dog archaeology dog and human relationship research esakal
विज्ञान-तंत्र

Dog-human Relationship : कुत्रा अन् मानवाची मैत्री 12 हजार वर्षांपूर्वीची! संशोधनातून समोर आली आश्चर्यकारक माहिती

Alaska dog archaeology dog and human relationship : मनुष्य आणि श्वान म्हणजेच कुत्रा यांच्यातील मैत्रीचे नाते तब्बल 12,000 वर्षांपूर्वीपासून असल्याचे पुरावे आता समोर आले आहेत.

Saisimran Ghashi

Dog and human relationship research : मनुष्य आणि श्वान म्हणजेच कुत्रा यांच्यातील मैत्रीचे नाते तब्बल 12,000 वर्षांपूर्वीपासून असल्याचे पुरावे आता समोर आले आहेत. अलास्कातील उत्खनन आणि नव्या संशोधनातून हे आश्चर्यकारक निष्कर्ष पुढे आले आहेत.

मानव-श्वान संबंधांचा शोध

अमेरिकेतील ऍरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासातून असे दिसून आले की, प्राचीन अमेरिकी लोक आणि श्वान यांच्यातील जवळचे संबंध याआधी समजल्या गेलेल्या कालावधीच्या आधीपासूनच अस्तित्वात होते. हे संशोधन सायन्स अॅडव्हान्सेस या विज्ञान पत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

या अभ्यासाचे प्रमुख संशोधक फ्रांस्वा लॅनो यांनी सांगितले की, "अमेरिकेत मानव आणि श्वान यांच्या जवळच्या नात्याचे पुरावे आम्हाला याआधीपेक्षा खूप पूर्वीचे मिळाले आहेत." या निष्कर्षांमुळे प्रथम अमेरिकेत आलेल्या लोकांनी श्वान सोबत आणले का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे, जो Anthropologists (मानववंशशास्त्रज्ञ) यांना फार काळापासून भुरळ घालत आहे.

अलास्कातील पुरातत्त्वीय पुरावे

संशोधकांनी अलास्कातील स्वान पॉइंट या ठिकाणी उत्खनन केले असता, एका प्रौढ श्वानाच्या पायाच्या हाडाचा (तिबिया) शोध लागला. रेडिओकार्बन डेटिंगद्वारे हे सिद्ध झाले की हे श्वान सुमारे 12,000 वर्षांपूर्वी म्हणजेच शेवटच्या हिमयुगाच्या काळात जगत होते. पुढे जून 2023 मध्ये, हॉलेंबाक हिल येथे केलेल्या उत्खननात 8,100 वर्षांपूर्वीचा एक जबड्याचा हाडाचा सापड झाला, ज्यावर पाळीव श्वानांच्या खुणा दिसून आल्या.

श्वानांच्या आहारातील संशोधन

या हाडांवर करण्यात आलेल्या रासायनिक विश्लेषणातून त्यांच्या आहारात सॅल्मन मासळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले. हे पुरावे दर्शवतात की, हे श्वान मानवांवर अन्नासाठी अवलंबून होते. "जंगली श्वान साधारणपणे सॅल्मन पकडत नाहीत, त्यामुळे हा पुरावा महत्वाचा ठरतो," असे या संशोधनातील सहलेखक बेन पॉटर यांनी सांगितले.

आदिवासी समुदायांचा सहभाग

या शोधांमुळे मानव आणि श्वान यांच्यातील बंधाचे स्वरूप स्पष्ट झाले असले, तरी हे प्राणी पूर्णतः पाळीव होते की तामद (तुलनेने माणसाच्या नियंत्रणाखाली) असे, याबाबत अजूनही शंका आहे.

या संशोधनादरम्यान अलास्कातील तनाना व्हॅलीमधील स्थानिक आदिवासी समुदायांच्या सहकार्याने काम करण्यात आले. हिली लेक समुदायातील सदस्य आणि पुरातत्त्वज्ञ एव्हलिन कोंब्स म्हणाल्या, "मागच्या हजारो वर्षांपासून आम्ही आमच्या सोबत्यांसोबत होतो, याचा पुरावा इतिहासात पाहणे प्रेरणादायक आहे."

या अभ्यासामुळे मानव-श्वान संबंधांचा इतिहास समृद्ध झाला असून, माणूस आणि प्राणी यांच्यातील भावनिक नातेसंबंध किती जुने आहेत, याचा वेध घेण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT