Call Forwarding
Call Forwarding eSakal
विज्ञान-तंत्र

Call Forwarding : 15 एप्रिलपासून कॉल फॉरवर्डिंग होणार बंद? फसवणूक रोखण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयाचा मोठा निर्णय

Sudesh

DoT to pause USSD-based Call Forwarding : भारतात गेल्या काही महिन्यांपासून 'कॉल फॉरवर्डिंग स्कॅम'ची प्रकरणं वाढली आहेत. याला आळा घालण्यासाठी आता टेलिकॉम मंत्रालय मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 15 एप्रिल 2024 पासून देशभरात USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात येणार आहेत.

"सध्या उपलब्ध USSD-based कॉल फॉरवर्डिंग सेवा पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत. याबाबत टेलिकॉम ऑपरेटर्सना आदेश देण्यात आले आहेत", असं टेलिकॉम मंत्रालयाने स्पष्ट केलं. ही सेवा कायमची बंद केली नसून, तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करणार असल्याचंही मंत्रालयाने स्पष्ट केलं.

काय आहे कॉल फॉरवर्डिंग?

कॉल फॉरवर्डिंग सेवा सुरू केल्यानंतर तुम्ही एखाद्या मोबाईल नंबरवर येणारे कॉल आणि मेसेज दुसऱ्या नंबरवर पुढे ढकलू शकता. आपल्या एका नंबरला नेटवर्क नसल्यास महत्त्वाचे कॉल्स मिस होऊ नयेत यासाठी ही सेवा भरपूर फायद्याची ठरते. मात्र, याचा फायदा घेत कित्येक जणांची फसवणूक देखील केली जात आहे.

स्कॅमर्स कशी करतात फसवणूक?

  • स्कॅमर तुम्हाला कॉल करून तुमच्या सिमकार्ड सर्व्हिस प्रोव्हाईडरचे कस्टमर केअर कर्मचारी असल्याचं सांगतात.

  • तुमच्या सिमकार्डमध्ये काही बिघाड झाल्याचं सांगून, त्यामुळे नेटवर्क आणि सर्व्हिस क्वालिटी खराब होत असल्याचं सांगतात.

  • ही समस्या सोडवण्यासाठी स्कॅमर तुम्हाला एक कोड एंटर करायला सांगतात.

  • हा कोड शक्यतो *401# असा असतो. या कोडसमोर ते एक फोन नंबर एंटर करायला सांगतात.

  • यानंतर तुमच्या सिमवर येणारे सर्व कॉल आणि मेसेज तुम्ही एंटर केलेल्या नंबरवर फॉरवर्ड होतात.

  • अशा प्रकारे कॉल फॉरवर्डिंग सुरू झाल्यास, तुम्हाला येणारे महत्त्वाचे ओटीपी किंवा टेक्स्ट मेसेजवर येणारे पासवर्ड देखील नवीन नंबरवर फॉरवर्ड होतात. त्यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. (Call Forwarding Scam)

यूजर्सवर काय होणार परिणाम?

फसवणूक टाळण्यासाठी म्हणून केंद्राने सर्वच कॉल फॉरवर्डिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तुम्ही स्वतः ही सेवा सुरू केली असेल, तर तीदेखील पॉझ होणार आहे. यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा कॉल फॉरवर्डिंग री-इनेबल करावं लागेल. यासाठी USSD व्यतिरिक्त इतर पर्याय निवडावे असा सल्ला मंत्रालयाने ग्राहकांना दिला आहे. ही सेवा कायमची बंद केली नसल्यामुळे, भविष्यात अधिक सुरक्षा लेअर्स आणि प्रतिबंधात्मक उपायांसोबत पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT