Driving Tips esakal
विज्ञान-तंत्र

Driving Tips : गाडी चालवताना ब्रेक फेल झाला तर! इमर्जंसी टिप्सनी अशी थांबवा uncontrolled कार

ब्रेक फेल झाल्यावर घाबरून जाऊ नका? या गोष्टी वाचा

Pooja Karande-Kadam

Car Driving Tips : आपण गाडी  कितीही व्यवस्थित चालवत असलो तरी गाडीनेच आपल्याला धोका दिला तर तूम्हाला जीवाला मुकावे लागते. कार चालवताना गाडीचा कोणता पार्ट कधी खराब होईल सांगता येत नाही. विचार करा गाडी चालवताना ब्रेक फेल झाला तर काय होईल.  अनेकदा नवशिक्या वाहन चालकांना ब्रेक फेल होण्यासारख्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते.

काही तांत्रिक अडचणीमुळे गाडीत बिघाड होतो आणि चालत्या गाडीचा ब्रेक काम करणं बंद करतो. अशावेळी काय करायचं हे माहिती नसल्याने अनेकांना जीवाला मुकावे लागते. गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देताना अशा प्रसंगावेळी काय करायचं हे सांगितले जाते. पण त्या गोष्टी लक्षात ठेवल्या जात नाहीत. 

त्यामूळेच आज गाडीचे ब्रेक फेल झाले तर काय करावे?, गाडी कशी थांबवावी याची माहिती घेऊयात.

  • एक्सीलरेटरवरून पाय बाजूला घ्या

ब्रेक फेल झाल्याचे जेव्हा लक्षात येईल तेव्हा एक्सीलरेटरवरून हळूहळू पाय काढा. गाडीचा वेग हळूहळू कमी करा, जेव्हा तुमच्या वाहनाचा वेग कमी होईल तेव्हा तुम्ही हँड ब्रेक ओढून गाडी थांबवू शकता.

  •  कारचे सर्व गीअर्स काढा

तुम्ही गाडी चालवत असाल आणि गाडीचे ब्रेक अचानक काम करणे बंद झाले. तर, सर्वात आधी कारचे सर्व गिअर्स एक-एक करून काढा. त्यामुळे वाहनाचा वेग आपोआप कमी होऊ लागेल. आणि जेव्हा वाहनाचा वेग कमी झाल्यास गाडीतून उडी मारून तूम्ही खाली उतरू शकता.

  • हँड ब्रेक वर-खाली करत राहा

जेव्हा गाडीचा वेग हळूहळू कमी होऊ लागतो. तेव्हा सर्व तुम्ही पार्किंग ब्रेक ब्रेक हळू हळू वर खाली हलवत रहा. जेणेकरून गाडी थांबेल.

  • गाडीच्या काचा उघडा

अशा अडचणीत गाडीतील सर्व लाईट ऑन करा. तसेच सर्व काचा उघडा. लाईटमूळे वाहनचालकांना सिग्नल मिळेल. ज्यामुळे तुम्ही इतरांसोबत सुरक्षित राहाल. कारच्या काचा उघड्या ठेवल्यास वाऱ्यामूळे गाडीचा वेग कमी होण्यास मदत होईल.

  • रिव्हर्स गियर टाकू नका

अशा स्थितीत कार चुकूनही रिव्हर्स गियरमध्ये टाकू नका. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एक्सलेटरचा वापर करू नका आणि फक्त क्लचचा वापर करा. अशा स्थितीत तुम्ही एसीदेखील ऑन करू शकता. त्यामुळे इंजिनवर दाब वाढेल आणि वेग कमी होईल.

  • गाडीचे इंजिन बंद करा

जर तुमच्याकडे कोणताही उपाय नसेल, तर वाहनाचे इंजिन बंद करा. हा उपाय सर्वात फायदेशीर आहे, ज्यामुळे जीव वाचण्याची शक्यता जास्त आहे. इंजिनच बंद केल्याने गाडी हळू हळू थांबते. आणि तूमचा जीव वाचू शकतो.

  • वाहन टेकडावर चालवा

ब्रेक फेल झालेल्या गाडीला वाळू किंवा चिखल थांबवू शकतो. चिखलात गाडीची चाके रूतुन बसतात आणि गाडी थांबते. गाडी जास्त वेगात पळत असेल तर गाडीच्या स्टेअरिंगवर कंट्रोल मिळवा आणि गाडी उंचावर न्या.

  • खडकाळ रस्ता करेल मदत

तुम्हाला तुमची गाडीर सपाट रस्त्यावर, दुभाजकावरून थांबवता येत नसेल, तर गाडी जास्त शेती असेल किंवा पाणवठा, मातीच्या रस्त्यावर न्या. यामूळे खडकाळ रस्त्यावर गाडीचा वेग कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

Latest Marathi News Live Update : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्याबाहेर सुषमा अंधारेंकडून ठिय्या

Supreme Court : 'महाकाल मंदिरासाठी आमची 200 वर्षे जुनी मशीद पाडली'; मुस्लिम पक्षाची सर्वोच्च न्यायालयात धाव, नेमकं काय घडलं?

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

SCROLL FOR NEXT