Power Bank Scam eSakal
विज्ञान-तंत्र

Power Bank Scam : 'हाय रिटर्न्स'चे आमिष दाखवून 150 कोटींची फसवणूक.. तुमच्याकडे तर नाहीत ना हे तीन अँड्रॉईड अ‍ॅप्स?

Banking App Scam : या तीन अँड्रॉईड अ‍ॅप्सवर ईडीने कारवाई केली आहे.

Sudesh

गुंतवणूकीच्या माध्यमातून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या तीन अँड्रॉईड अ‍ॅप्सवर ईडीने कारवाई केली आहे. या तीन अ‍ॅप्सच्या माध्यमातून तब्बल 150 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हजारो लोकांना याचा फटका बसला आहे.

याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) वैभव दीपक शाह, सागर डायमंड्स, आरएचसी ग्लोबल एक्स्पोर्ट्स आणि काही अन्य जणांवर गुन्हा दाखल केला. कथित पॉवर बँक फसवणूक प्रकरणात एकूण 59.44 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार; उत्तराखंड पोलीस, कर्नाटक पोलीस, दिल्ली पोलीस स्पेशल सेल याठिकाणी दाखल असलेल्या तक्रारींवरुन ईडीने ही कारवाई केली आहे. यामध्ये चिनी कंपन्याचा देखील सहभाग असल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे. (Scam News)

कोणते आहेत अ‍ॅप्स?

गुगल प्ले स्टोअरवर असणाऱ्या पॉवर बँक अ‍ॅप, टेस्ला पॉवर बँक अ‍ॅप आणि ईजप्लॅन अ‍ॅप या अ‍ॅप्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. काही चिनी ठगांनी भारतातील कंपन्यांचे सीए आणि सचिव यांच्यासोबत संगनमत करुन या फेक कंपन्या उभारल्या असल्याचं ईडीने म्हटलं आहे.

कशी करायचे फसवणूक?

हे अ‍ॅप्स लोकांना पैशांच्या गुंतवणूकीवर हाय रिटर्न देण्याचे आमिष दाखवायचे. एखाद्या व्यक्तीने पैसे गुंतवले असता, त्याचं अकाउंट थेट ब्लॉक केलं जायचं आणि सर्व पैसे हडपण्यात येत होते. अशा प्रकारे तब्बल 150 कोटी रुपये लुबाडण्यात आले होते. तसंच खोटी आयात दाखवून हे पैसे विदेशात देखील पाठवण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांनी 2021 साली जून महिन्यात सर्वात पहिल्यांदा याप्रकरणी कारवाई केली होती. सध्या याबाबत तीन लोकांविरोधात दिल्लीतील पीएमएलए विशेष न्यायालयात खटला सुरू आहे.

काय घ्यावी खबरदारी?

पैशांची गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसंच खासगी अ‍ॅप्सचा वापर करण्याऐवजी बँकांच्या अधिकृत अ‍ॅप्सना प्राधान्य द्यावं. पैशांच्या गुंतवणुकीबाबत एखादं अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची रेटिंग आणि रिव्ह्यू नक्की तपासावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT