tork kratos electric bike
tork kratos electric bike 
विज्ञान-तंत्र

२६ जानेवारीला लाँच होणार 'ही' स्वदेशी इलेक्ट्रिक बाईक; पाहा डिटेल्स

रोहित कणसे

tork kratos electric bike : भारतीय वाहन बाजारात या महिन्यात आणखी एक इलेक्ट्रिक बाईक लॉन्च होणार आहे. ही इलेक्ट्रिक बाईक पूर्णपणे भारतात बनवली जाणार आहे. निर्माता टॉर्क मोटर्स या महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर आपली ही बाइक Kratos लाँच करणार आहे. 26 जानेवारी रोजी लॉन्च झाल्यानंतर, कंपनी या नवीन EV साठी बुकिंग देखील सुरू करेल.

कंपनीच्या मते, इलेक्ट्रिक बाइक Kratos चे बुकिंग 26 जानेवारीपासून सुरू होईल, जिथे ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ही इलेक्ट्रिक मोटरसायकल बुक करू शकतील. मोटारसायकलची डिलिव्हरी या वर्षी मार्चच्या आसपास सुरू होण्याची अपेक्षा आहे.

फीचर्स

Torq Kratos T6X कॉन्सेप्ट मॉडेलवर आधारित आहे जो सप्टेंबर 2016 मध्ये लॉंच झाले होते. Kratos एक मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वाहन आहे. यात अक्षीय फ्लक्स मोटर दिली आहे. यामध्ये, तुम्हाला लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळेल. Kratos मध्ये एक ऑपरेटिंग सिस्टम देखील असेल जी पॉवर मॅनेजमेंटमध्ये मदत करेल. हे रिअल टाइममध्ये विजेच्या वापरावर लक्ष ठेवते. यासोबतच ही ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या प्रवासाची संपूर्ण माहिती देखील ठेवेल. टॉर्क क्रॅटोसमध्ये नवीन बॉडीवर्क, स्प्लिट सीट्स, एलईडी लाईट्स सह लॉंच होईल

रेंज काय असेल

यामध्ये तुम्हाला नवीन डिझाइन केलेली फ्रेम पाहायला मिळेल. त्याची कामगिरी भारतातील 150cc-160cc स्पोर्ट्स कम्युटर मोटरसायकलच्या बरोबरीची असेल. जरी टॉर्क T6X मध्ये 100 किमा रेंजचा दावा केला असेल तरीही तुम्हाला Kratos च्या रेंजमध्ये बदल दिसू शकतो, जो लॉन्च झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

किंमत

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, ही नवीन इलेक्ट्रिक बाइक भारतीय बाजारपेठेत 1.20 लाख ते 1.40 लाख (एक्स-शोरूम) च्या किंमतीला लॉन्च केली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: '...तर ४०० जागा आल्यास ज्ञानवापीच्या जागी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर उभारले जाईल', मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

IPL 2024 Playoff Race : दिल्लीच्या विजयाने प्लेऑफचे बदलले समीकरण! लखनौचा खेळ खल्लास... 3 मध्ये चुरशीची लढत...

Loksabha Election : हरियाना काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली ; परिस्थिती अनुकूल, तरीही कुरघोडीचे राजकारण रंगले

Punjabi Aloo Paratha : नाश्त्याला बनवा पंजाबी स्टाईल बटाट्याचा पराठा, वाचा 'ही' सोपी रेसिपी

Kolihan Mine: खाणीत लिफ्ट पडल्याने 14 लोक अडकले, बचाव कार्य सुरू...7 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT