Electric Highway eSakal
विज्ञान-तंत्र

Electric Highway : भारतात तयार होणार इलेक्ट्रिक हायवे; मेट्रोप्रमाणे बस-ट्रकही धावणार विजेवर!

देशातील दोन मोठ्या शहरांमध्ये असा हायवे तयार करण्यात येणार आहे.

Sudesh

भारतात आता मेट्रो आणि लोकलप्रमाणेच बस-ट्रकही विजेवर धावू शकणार आहेत. यासाठी देशात इलेक्ट्रिक हायवे तयार करण्यात येणार आहे. जर्मनी आणि स्वीडनप्रमाणेच जगातील अनेक देशांमध्ये हा प्रयोग यापूर्वीच झाला आहे. आता देशातील दोन मोठ्या शहरांमध्ये असा हायवे तयार करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील सहा वर्षांमध्ये या हायवेचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी देशातील दिल्ली आणि जयपूर या दोन शहरांची निवड करण्यात आली आहे. टाटा आणि सिमन्स अशा मोठ्या कंपन्यांनी या प्रकल्पात रस दाखवला आहे.

चार्जिंगची नसणार गरज

लोकल रेल्वे आणि मेट्रोला ज्याप्रमाणे बॅटरी चार्ज करण्याची गरज भासत नाही. अगदी त्याप्रमाणेच या हायवेवरून जाणाऱ्या बस आणि ट्रकना चार्जिंगची गरज भासणार नाही. तसेच, यावरुन धावणारे ट्रक आणि बसेस सुमारे १०० किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगाने धावतील.

जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक हायवे

सध्या यासाठी नवीन हायवे बनवण्यात येणार नसून, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरील एका लेनचं रुपांतर इलेक्ट्रिक रस्त्यात करण्यात येणार आहे. या लेनच्या वर विजेच्या तारा बसवण्यात येतील. सध्या जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक हायवे जर्मनीमध्ये आहे. मात्र, भारतातील प्रकल्प पूर्ण झाल्यावर हाच जगातील सर्वात मोठा ई-हायवे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम, 'या' जिल्ह्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

Paithan Accident: पेट्रोल भरण्यासाठी कार वळवली, पण क्षणात काळाचा घाला; पाचोडजवळ कंटेनरच्या धडकेत दोघे ठार, एक जण गंभीर

करकायदा : रिट्स, इन्व्हिट्सवरील लाभांश करमुक्त

स्मार्ट माहिती : आयटी व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यात दरी

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली; झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज निर्णायक चर्चा

SCROLL FOR NEXT