electric scooter sales decline up to 66 percent fame ii subsidy ola ather bajaj tvs hero sales dropped  
विज्ञान-तंत्र

Electric Scooter : ओला, एथर अन् हिरोच्या EVs कडे खरेदीदाराची पाठ! नेमकं का मंदावली इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री?

रोहित कणसे

मागील काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक टू-व्हिलर गांड्याच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र इलेक्ट्रिक टू-व्हिलर वाहनांना दिली जाणारी सब्सिडी २१ जून २०२३ पासून कमी केल्यामुळे या वाहानाच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाढलेल्या किंमती मुळे इलेक्ट्रिक बाइक आणि स्कूटर खरेदी करण्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते भारत सरकारकडून FAME II सब्सिडी बंद केल्यामुळे वाहन उत्पादकांनी या गाडांच्या किमतींमध्ये वाढ करावी लागली आहे. एका रिपोर्टनुसार जून २०२३ रोजी विक्रीत ६० टक्के घट पाहायला मिळाली आहे. मे २०२३ मध्ये विकलेल्या १,०५,००० यूनिट्सच्या तुलनेत २६ जून २०२३ पर्यंत विक्रीचा आकडा ३५,४६४ यूनिट पर्यंत खाली आला आहे.

इलेक्ट्रिक टू-व्हिलर गाड्यांच्या विक्रीमध्ये मागील ५ महिन्यांत नवे उच्चांक गाठले आहेत.पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे वीजेवर चालणाऱ्या या गाड्या खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

'ओला'ला देखील फटका

FAME II सब्सिडी कमी केल्याने सर्व इलेक्ट्रिक टू-व्हिलर गाड्यांच्या किंमती वाढवाव्या लागल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रिक बाइक्सच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी ओला इलेक्ट्रिकची विक्री जून २०२३ मध्ये कमी होऊन १४,०७३ युनिट्स झाली आहे. जी मे २०२३ मध्ये २८,६१२ युनिट्स होती आणि एप्रिल २०२३ मध्ये २२,०२४ युनिट्स होती.

हिरो इलेक्ट्रिक

हिरो इलेक्ट्रिकची विक्री देखील जून २०२२ मध्ये विक्री झालेल्या ६,४८६ युनिट्सच्या तुलनेत जून २०२३ मध्ये कमी होऊन ९७० युनिट्स झाली. टीव्हीएस मोटर्सची विक्री देखील जून २०२३ मध्ये २०,३९६ युनिट्सवरून ५,२५३ युनिट्स पर्यंत घसरली आहे.

विक्री वाढवण्याचा प्लॅन काय?

संपूर्ण टू-व्हिलर सेगमेंटमध्ये घटलेली विक्री पुर्ववत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सराकरने त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा. तसेच इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मीती आणि विक्रीसाठी योग्य वातावरण तयार केलं जावे.सरकारच्या पाठिंब्याशिवाय ग्रीन एनर्जीचं स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT