Twitter New Logo Esakal
विज्ञान-तंत्र

Twitter New Logo: चिमणी उडाली! अखेर इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदललाच

ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर बर्ड लोगो बदलला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर बर्ड लोगो बदलला आहे. आता तुम्हाला ब्लू बर्डच्या जागी "X" दिसेल. मस्कला "X" नावाचे "सुपर अॅप" तयार करायचे आहे, जे चीनच्या WeChat सारखे आहे.

X.com वर गेल्यास Twitter उघडेल. इलॉन मस्क आणि ट्विटर सीईओ लिंडा याकारिनो यांचे प्रोफाइल बॅज देखील बदलले आहेत. बॅजवर निळ्या पक्ष्याच्या जागी X लिहिलेले आहे.

ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात येणार असून, लवकरच आपण ट्विटर ब्रँडला अलविदा करू. ट्विटरसोबतच हळू हळू सर्वच पक्ष्यांना आपण उडवून लावू, अशा आशयाचं ट्विट मस्क यांनी केलं होतं. यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं होतं.


ट्विटर प्रोफाइल फोटो बदलला

लिंडा याकारिनोने ट्विटरवर तिच्या एका पोस्टद्वारे ट्विटरचा नवीन लोगो शेअर केला आहे. Twitter चा लोगो बदलण्यासाठी फक्त 24 तास लागले, दोन दिवस अगोदर मस्कने त्याच्या 149 दशलक्ष फॉलोअर्सना X लोगो सुचवण्यासाठी आमंत्रित केले, त्यानंतर डिझाईनपैकी एक निवडून त्याचा नवीन प्रोफाइल फोटो बनवला.

ट्विटरचा नवा लोगो देखील ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयात दिसला. सीईओ लिंडा याकारिनो यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर मुख्यालयाचा फोटो शेअर केला आहे.

ट्विटरवरील नवीन बदलांमुळे यूजर्सना पहिल्यांदाच अनेक नवीन गोष्टी करण्याची संधी मिळणार आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ऑडिओ, व्हिडिओ, मेसेजिंग व्यतिरिक्त बँकिंग आणि ऑनलाइन पेमेंट सारखे काम देखील केले जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कंपनी ट्विटर म्हणजेच X मध्ये सुधारणा करेल. इन्स्टाग्रामच्या नवीन अॅप थ्रेड्ससोबत ही स्पर्धा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT