X Audio Video Calls eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk : 'एक्स' देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर! आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलही करता येणार; इलॉन मस्कची मोठी घोषणा

X Audio-Video Calls : इलॉन मस्कने यापूर्वी ट्विटरचं नाव बदलून 'एक्स' करण्याचा निर्णय घेतला होता.

Sudesh

X New Features : इलॉन मस्कने आज एक मोठी घोषणा केली आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळणार आहे. मस्कने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून याबाबत पोस्ट केली आहे.

"एक्सवर आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स करता येतील. लवकरच हे फीचर उपलब्ध होणार आहे. आयओएस, अँड्रॉईड, मॅक आणि पीसी या सर्व प्लॅटफॉर्मवर हे फीचर काम करेल." असं मस्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फोन नंबरची गरज नाही

विशेष म्हणजे, एक्स अकाउंटच्या माध्यमातून हे ऑडिओ/व्हिडिओ कॉल्स होत असल्यामुळे; समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर तुमच्याकडे असण्याची गरज नाही. म्हणजेच यूजर्स आता आपला नंबर शेअर न करताही एखाद्याशी फोनवर बोलू शकणार आहेत.

एक्स ठरणार 'ग्लोबल अ‍ॅड्रेस बुक'

आयफोन, अँड्रॉईड, अ‍ॅपल मॅकबुक आणि विंडोज किंवा अन्य पीसी अशा सर्व डिव्हाईसेसना हे फीचर्स सपोर्ट करणार आहेत. त्यामुळे 'एक्स' हे एकप्रकारे ग्लोबल अ‍ॅड्रेस बुक ठरेल, असं इलॉनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला देणार टक्कर

या फीचरमुळे आता एक्स हे थेट मेटाच्या व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देऊ शकतं. विशेष म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल करण्यासाठी आपल्याकडे समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर असणं आवश्यक आहे. एक्सवर कॉल करताना याची आवश्यकता नसल्यामुळे लोक याचा अधिक वापर करण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी मेटाने थ्रेड्स नावाचं अ‍ॅप लाँच करून 'एक्स'ला मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, थ्रेड्सची हवा काही दिवसांतच कमी झाली. यानंतर आता इलॉनने एक्समध्ये कॉलिंग फीचरची घोषणा करून मार्क झुकेरबर्गवर डाव टाकला आहे. त्यामुळे आता मेटा याला कसं प्रत्युत्तर देतंं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT