Elon Musk Scam  eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

Deepfake : हा प्रकार दक्षिण कोरियातील जेओंग जी-सुन नावाच्या एका तरुणीसोबत घडला आहे. या तरुणीला इलॉन मस्कने व्हिडिओ कॉलवर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

Sudesh

Elon Musk Deepfake Scam : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणजे इलॉन मस्क. स्पेस एक्स, टेस्ला, एक्स (ट्विटर) अशा कित्येक कंपन्यांचे ते सीईओ/मालक आहेत. इलॉन मस्कचे जगभरात कित्येक चाहते आहेत. कित्येक तरुणींना देखील तो आवडतो. त्याला एक्सवर किंवा अन्य ठिकाणी "Love You" म्हणणाऱ्या देखील कित्येक तरुणी आहेत. मात्र, एका तरुणीला त्याचा रिप्लाय मिळाला.. अन् तिथूनच तिचे वाईट दिवस सुरू झाले.

हा प्रकार दक्षिण कोरियातील जेओंग जी-सुन नावाच्या एका तरुणीसोबत घडला आहे. या तरुणीला इलॉन मस्कने व्हिडिओ कॉलवर आपल्या प्रेमाची कबुली दिली. यानंतर या दोघांमध्ये बोलणं वाढत गेलं आणि अशातच या तरुणीला सुमारे 40 लाखांचा गंडा बसला. मात्र, इलॉन मस्क असं का करेल? त्याच्यामुळे या तरुणीचे पैसे कसे बुडाले? तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील, तर पुढे वाचा..

हा खरंतर डीपफेक स्कॅमचा (Deepfake Scam) एक प्रकार आहे. या तरुणीने ज्या व्यक्तीसोबत संवाद साधला होता, ती खरंतर इलॉन मस्क नव्हतीच. या तरुणीने सांगितलं, की सुरुवातीला तिला संशय आला होता. मात्र या व्यक्तीने स्पेस एक्स, टेस्ला अशा फॅक्टरीमधील आपले फोटो शेअर केले होते. तसंच, त्या ठिकाणाहून त्याने चक्क व्हिडिओ कॉलही केले होते. यामुळे ही व्यक्ती इलॉनच असल्याची खात्री या तरुणीला पटली. (Elon Musk Deepfake)

त्यानंतर या व्यक्तीने तरुणीला सांगितलं की मी तुझे पैसे माझ्या कंपनीमध्ये गुंतवून ते वाढवू शकतो. आतापर्यंत या तरुणीला खात्री पटली होती की हा खरा इलॉन आहे. त्यामुळे तिनेही आजिबात विचार न करता त्याला पैसे पाठवले. मात्र त्यानंतर तिला समजलं की तिची फसवणूक झाली आहे. या तरुणीने चक्क कर्ज काढून त्या व्यक्तीला पैसे पाठवले होते. त्यामुळे आता तिच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. (Fake Elon Musk)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT