Tesla Robotaxi eSakal
विज्ञान-तंत्र

Tesla Robotaxi : इलॉन मस्क ऑगस्टमध्ये लाँच करणार 'रोबोटॅक्सी', मात्र टेल्साच्या गाड्या खरंच विश्वासार्ह आहेत का?

Elon Musk : इलॉन मस्कने यापूर्वी रोबोटॅक्सी लाँच करण्यासाठी 2019 ची डेडलाईन दिली होती. मात्र, काही कारणास्तव त्यावर्षी हे प्रॉडक्ट लाँच झालं नव्हतं.

Sudesh

Elon Musk Robotaxi : इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीकडून गेल्या काही वर्षांपासून 'रोबोटॅक्सी' प्रोजेक्टबद्दल सांगितलं जात होतं. आता मस्कने याबाबत मोठी अपडेट जाहीर केली आहे. 8 ऑगस्ट रोजी आपण रोबोटॅक्सी सादर करणार असल्याचं मस्कने एका एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, टेस्लाच्या गाड्या अजूनही विश्वासार्ह नसल्याचा आरोप कित्येक नेटिझन्स करत आहेत.

काय आहे रोबोटॅक्सी?

रोबोटॅक्सी हा टेस्लासाठी एक गेम चेंजर प्रोजेक्ट ठरणार आहे. यामध्ये टेस्ला अशा गाड्या तयार करणार आहे, ज्यामध्ये ना स्टिअरिंग व्हील असेल, ना ड्रायव्हर, ना पेडल्स. या 'टॅक्सी' पूर्णपणे ऑटोमॅटिक असतील. त्या प्रवाशांना पिक करून, अपेक्षित ठिकाणी ड्रॉप करतील.

मस्कवर होतेय टीका

दरम्यान, रोबोटॅक्सीबाबत घोषणा केल्यापासूनच इलॉन मस्कवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. टेस्लाच्या गाड्यांमध्ये असणारं ऑटोपायलेट हे आजिबात सुरक्षित नसल्याचं कित्येकांचं म्हणणं आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या व्हिडिओमध्ये दिसतंय, की टेस्लाचं ऑटोपायलेट हे बंद असलेल्या रस्त्यावर गाडी नेत आहे, दुसऱ्या गाडीला जवळपास धडकत आहे, आणि साध्या-साध्या वळणांवर देखील कन्फ्यूज होत आहे. व्हिडिओमधील व्यक्ती ऐनवेळी स्टिअरिंग हातात घेऊन अपघात होण्यापासून वाचते. मात्र, रोबोटॅक्सीमध्ये स्टिअरिंग किंवा पेडल्स नसल्यामुळे आतील प्रवाशांचं काय होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इलॉन मस्कने यापूर्वी रोबोटॅक्सी लाँच करण्यासाठी 2019 ची डेडलाईन दिली होती. मात्र, काही कारणास्तव त्यावर्षी हे प्रॉडक्ट लाँच झालं नव्हतं. यावेळी मस्कवर टीका करण्यात आली होती. तेव्हा मस्कने डेडलाईन न पाळल्याबद्दलची टीका आपल्याला मान्य असल्याचं म्हटलं होतं. आता इलॉनने पुन्हा एकदा रोबोटॅक्सी सादर करण्याची नवी तारीख लाँच केली आहे. त्यामुळे आता काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाज वाटत नाही का? खासदार निधी खर्च होत नसल्यानं कंगना रनौत संतापल्या; म्हणाल्या, निगेटिव्ह प्रचार होतोय, रील्स बनतायत

…म्हणून मुक्ता बर्वेने हिंदीत फार काम केलं नाही, कारण सांगत अभिनेत्री म्हणाली...'ऑडिशन देत असते पण...'

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

Marathi News Live Updates : लाखोंच्या अनुदानात अपहार, महिला तलाठ्याला अटक

Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीने भारताच्या 'Best' गोलंदाजाला झोडले; ४,६,४ असे सुरेख फटके खेचले, पाहात रहावा असा Video

SCROLL FOR NEXT