Elon Musk on Twitter Paid eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk : आता सर्वांनाच 'एक्स' वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे? इलॉन मस्कने दिले संकेत

Twitter : इलॉन मस्कने ट्विटरचं नाव बदलून एक्स असं केलं होतं. यासोबतच ट्विटरचा लोगोही बदलण्यात आला होता.

Sudesh

इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटमध्ये कित्येक बदल करण्यात आले आहेत. ट्विटरचं नावही बदलून एक्स करण्यात आलं आहे. तसंच त्याचा लोगोही बदलण्यात आला आहे. आता आणखी एक मोठा बदल होण्याचे संकेत मस्कने दिले आहेत.

एक्सवरील व्हेरिफिकेशन बॅज (ब्लू टिक) मिळवण्यासाठी इलॉन मस्कने सबस्क्रिप्शन प्लॅन सुरू केला होता. यानंतर आता कदाचित सर्वच यूजर्सना एक्स वापरण्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत बोलत असताना मस्क यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

CNBC ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भविष्यात सर्वच एक्स यूजर्सना ही सर्व्हिस वापरण्यासाठी मासिक सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. अर्थात, हे कधीपासून लागू होईल आणि किती पेमेंट असणार आहे याबाबत मस्कने स्पष्टता दिली नाही.

कशामुळे घेणार निर्णय?

एक्स प्लॅटफॉर्मवर वाढते फेक यूजर्स आणि बॉट्स यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. मस्कने दिलेल्या माहितीनुसार, एक्सवर आता 550 मिलियन यूजर्स आहेत. तसंच या प्लॅटफॉर्मवर दररोज 100 ते 200 मिलियन पोस्ट येतात, असंही मस्क यांनी यावेळी सांगितलं.

या यूजर्समधील किती खरे यूजर्स आहेत आणि किती बॉट्स आहेत याबाबत मात्र इलॉनने स्पष्टीकरण दिलं नाही. मात्र, एक्सवर हेट स्पीच आणि फेक अकाउंट्सचा सुळसुळाट झाल्यामुळे कित्येक मानवाधिकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. यामुळेच मस्क देखील बॉट्सची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

यापूर्वी देखील मस्कने फेक अकाउंट्स आणि स्पॅम कमी करण्यासाठी एक्सवर पोस्ट लिमिट लागू केलं होतं. तसंच, मेसेज करण्यावर देखील निर्बंध लागू केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT