Elon Musk Hiring for X eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Hiring : ट्विटरवरुन ७००० कर्मचाऱ्यांना काढलं; आता 'एक्स'वर करणार मेगा भरती! काय आहे इलॉन मस्कचा प्लॅन?

X Twitter Updates : मोठ्या प्रमाणात लेऑफ केल्यानंतरही 'एक्स' कंपनी चांगल्या प्रकारे काम करत आहे.

Sudesh

Twitter X Recruitment : 'एक्स' (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. इलॉन मस्कने विकत घेतल्यानंतर ट्विटरमधून सात हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं होतं. यानंतर आता कंपनीत पुन्हा भरती होणार असल्याचे संकेत सीईओ लिंडा याक्कारिनो यांनी दिले आहेत.

सीएनबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कंपनीच्या सीईओंनी हे संकेत दिले. "कंपनी पूर्वी कॉस्ट डिसिप्लिन या टप्प्यात होती. मात्र, आता कंपनीची ग्रोथ होत आहे. कंपनीची वाढ म्हणजे नवीन भरती", असं त्या म्हणाल्या.

कंपनी करतेय प्रगती

मोठ्या प्रमाणात लेऑफ केल्यानंतरही 'एक्स' कंपनी चांगल्या प्रकारे काम करत आहे. मस्कने विकत घेतल्यानंतर कित्येक जाहिरातदारांनी ट्विटर सोडलं होतं. मात्र, आता हे जाहिरातदार देखील परत येत असल्याचं लिंडा यांनी सांगितलं. (Twitter layoffs)

लेऑफ होतं गरजेचं

यावेळी बोलताना लिंडा यांनी कंपनीने केलेल्या कामगार कपातीचं समर्थन केलं. हा निर्णय अवघड मात्र गरजेचा होता. कंपनीची आर्थिक परिस्थिती स्थिर करण्यासाठी हे गरजेचं होतं, असं त्या म्हणाल्या.

सध्या कंपनीच्या लिंक्डइन किंवा इतर सोशल मीडिया हँडलवर भरतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एक्सच्या करिअर्स वेबसाईटवर देखील याबाबत पोस्ट करण्यात आलेली नाही. मात्र, लिंडा यांच्या वक्तव्यानंतर लवकरच कंपनीत मोठी भरती होईल, असं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT