Elon Musk Neuralink Issues eSakal
विज्ञान-तंत्र

Neuralink : न्यूरालिंक प्रोजेक्ट धोक्यात? रुग्णाच्या मेंदूत बसवलेल्या चिपमध्ये तांत्रिक अडचणी.. इलॉन मस्कच्या कंपनीने दिली माहिती

Elon Musk : न्यूरालिंकने दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या या उपकरणासाठी मजकूर प्रविष्ट करणे (Text Entry) आणि कर्सर नियंत्रण सुधारण्यावर काम करत आहेत.

Sudesh

Elon Musk Neuralink Issues : इलॉन मस्कची ब्रेन टेक्नॉलॉजी कंपनी न्यूरालिंकने काही महिन्यांपूर्वीच एका रुग्णाच्या डोक्यात चिप बसवली होती. मात्र, या उपकरणात काही तांत्रिक अडचणी आल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. एका ब्लॉग पोस्टद्वारे न्यूरालिंकने हे अपडेट शेअर केलं आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीमध्ये रुग्ण नोलँड अर्बाऊघ (Noland Arbaugh) यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतरच्या काही आठवड्यांत, मेंदूच्या ऊतीमध्ये (brain tissue) बसवलेल्या इलेक्ट्रोडयुक्त धाग्यांपैकी काही धागे त्या ऊतीपासून बाहेर येऊ लागले. यामुळे, हे उपकरण व्यवस्थित काम करत नव्हते, असे कंपनीने स्पष्ट केले.

न्यूरालिंकने काय उपाय केला?

कंपनीने सांगितलं, की त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये केलेल्या दुरुस्तीच्या माध्यमातून या त्रुटीची भरपाई केली. सॉफ्टवेअरच्या बदलामुळे "नोलँड सुरुवातीच्या कामगिरीपेक्षा अधिक जलद आणि टिकून राहणारी कामगिरी करू शकत आहे", असं कंपनीने स्पष्ट केलं

आता पुढे काय?

न्यूरालिंकने दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या या उपकरणासाठी मजकूर प्रविष्ट करणे (Text Entry) आणि कर्सर नियंत्रण सुधारण्यावर काम करत आहेत. अशाच प्रकारे रोबोटिक हात आणि व्हीलचेअर अशा वास्तविक जगातील उपकरणांना वापरण्यासाठी देखील हा रुग्ण सक्षम व्हावा यादृष्टीने कंपनी काम करत आहे.

शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील न्यूरोसर्जन एरिक ल्यूथर्ड्ट यांनी ब्लूमबर्गला सांगितले, "इंजिनिअर्स आणि शास्त्रज्ञ हे विसरतात की, मेंदू इंट्राक्रॅनियल जागेमध्ये किती हालचाल करतो. तुम्ही तुमच्या डोक्याची थोडीशी जरी हालचाल केली, तरी आतील पेशी किंवा उती या कित्येक मिलीमीटर पर्यंत हालचाल करू शकतात."

पॅराड्रोमिक्स ही दुसरी एक कंपनी देखील ब्रेन इम्प्लांटवर काम करत आहे. या कंपनीचे सीईओ मॅट एंजल यांनीदेखील याप्रकरणी चिंता व्यक्त केली. चिपमधील धागे जर बाहेर येत असतील तर ही नक्कीच सामान्य बाब नाही, असं ते म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रीमंतीचा दिखावा की कलाकृतीचा संदेश? शुद्ध सोन्यापासून घडवलेल्या 'टॉयलेट'ची जगात चर्चा, ट्रम्प यांना देऊ केले होते Toilet; किती किंमत?

मराठी अभिनेत्रीच्या धाकट्या भावाला एमपीएससी परीक्षेत अभूतपूर्व यश; सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

Gold Silver Prices Drop: उडवा बार, सोने-चांदीचे उतरले भाव! लग्नसराईपूर्वी खरेदीसाठी सराफा बाजारामध्ये वाढली गर्दी

Mappls उठवणार Google Maps चा बाजार? आता रस्त्यासह एका क्लिकवर मिळणार मेट्रोची A टू Z माहिती..कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Pune Elections : पुणे जिल्हा निवडणूक, ६० हजार हरकतींवर सुनावणी पूर्ण; १४ नगर परिषदांसाठी अंतिम मतदारयादी जाहीर

SCROLL FOR NEXT