Musk Facebook Offer eSakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk Offer : 'नाव बदला, 1 बिलियन डॉलर्स देतो'; विकिपीडियानंतर आता इलॉन मस्कची फेसबुकला ऑफर!

Musk Zuckerberg Fight : मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि एक्स (ट्विटर) कंपनीचे मालक इलॉन मस्क यांच्यामधील वाद जगजाहीर आहे.

Sudesh

Musk Facebook Offer :

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे इलॉन मस्क हे नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी विकिपीडिया कंपनीला एक विचित्र ऑफर दिली होती. कंपनीचं नाव डिकीपीडिया केल्यास मी तुम्हाला 1 बिलियन डॉलर्स देईल असं त्यांनी म्हटलं होतं. आता अशीच ऑफर त्यांनी फेसबुकला देखील दिली आहे.

दि बेबीलॉन बी नावाच्या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. या वेबसाईटची एक्स पोस्ट स्वतः इलॉन मस्कनेच शेअर केली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकचं नाव बदलून 'फेसबूब' ठेवलं, तर आपण मार्क झुकरबर्गला 1 बिलियन डॉलर्स देऊ; असं इलॉन मस्क म्हणाले आहेत.

कंपनीचं नाव बदलल्यानंतर 'Faceboob'वर लॉग-इन करताना लोकांना भरपूर आनंद होईल, असंही मस्क म्हणाले. तसंच, "नवीन वेबसाईटसाठी मी आधीपासून खूप विचार केला आहे; माझ्या मते तरी माझ्या या संकल्पना अतिशय चांगल्या आहेत" असंही ते म्हणाले. (Tech News)

मस्क-झुकरबर्ग वाद

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि एक्स (ट्विटर) कंपनीचे मालक इलॉन मस्क यांच्यामधील वाद जगजाहीर आहे. काही दिवसांपूर्वीच मार्क झुकरबर्गने नवीन थ्रेड्स अ‍ॅप लाँच केलं होतं. यानंतर आपल्या अ‍ॅपची कॉपी केल्याचा आरोप मस्कने मार्कवर केला होता. याच दरम्यान दोघांमधील केज फाईटचा मुद्दाही गाजत होता. मात्र, त्याबाबत पुढे कोणतीही अपडेट आली नाही.

विकिपीडियाला दिली होती अशीच ऑफर

विकिपीडिया कंपनीला देखील यापूर्वी इलॉन मस्क यांनी अशीच ऑफर दिली होती. या वेबसाईटचं नाव कमीत कमी एक वर्षापर्यंत Dickipedia ठेवल्यास, आपण त्यांना 1 बिलियन डॉलर्स देऊ असं मस्क म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT