Elon Musk Slams Apple-OpenAI Deal, Promotes Grok Phone esakal
विज्ञान-तंत्र

Elon Musk on Apple : ॲपलसोबत OpenAI च्या युतीमुळे इलॉन मस्क संतापले, मोठा निर्णय घेणार? नेमकं काय आहे प्रकरण?

Elon Musk Opposes : OpenAI मुळे ग्राहकांची सुरक्षा आणि प्रायव्हसी धोक्यात,मस्कचा दावा

Saisimran Ghashi

Apple-OpenAI Collaboration : ॲपलच्या WWDC 2024 मध्ये झालेल्या घोषणांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती IOS 18 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर. यासाठी एप्पलने OpenAI सोबत करार केला आहे. पण या करारामुळे इलॉन मस्क, टेस्लाचे CEO, खूप संतापले आहेत.

मस्क यांनी आपल्या X (ट्विटर) वरून ॲपल आणि OpenAIच्या पार्टनरशिपवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पोस्ट केले की, "OpenAI जर iPhone च्या OS मध्ये आला तर माझ्या कंपनीच्या आवारात या डिव्‍हाइसेस वापरण्यास परवानगी मिळणार नाही.

"इतकेच नाही तर त्यांनी असेही म्हटले आहे की, "कार्यालयाच्या इमारतीत कोणतेही Apple डिव्‍हाइस असणार नाहीत. बाहेरून येणाऱ्यांनाही त्यांची Apple डिव्‍हाइसेस बाहेर ठेवावी लागतील आणि त्यांना एका विशेष बॉक्समध्ये ठेवले जाईल."

इलॉन मस्क OpenAI च्या चॅटबॉटला Spyware (गुप्तहेर सेवा) मानतात. ते म्हणतात, "ॲपल स्वतःची AI बनवण्याइतके सक्षम नाहीत पण OpenAI तुमची सुरक्षा आणि प्रायव्हसी राखेल यावर विश्वास करतात हे खरंच विचित्र आहे.तुमचा डेटा OpenAI कडे गेला की काय होतंय ते ॲपलला देखील माहिती नाही. ते तुमची फसवणूक करत आहेत."

ॲपलने वापरकर्तांना 'ऑप्ट-इन' (नोंदणी) पर्याय देण्याचे जाहीर केले आहे पण मस्कनी यावरही टीका केली. या सर्व वादाविवादांच्या दरम्यान इलॉन मस्कने त्यांच्या नवीन फोन - Grok फोनबद्दल इशारा दिला आहे. Grok हा xAI द्वारे विकसित केलेला कृत्रिम बुद्धिमत्ता चॅटबॉट आहे. हा फोन लवकरच बाजारात येऊ शकतो असे संकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT